Chhagan Bhujbal Eknath Shinde Shiv Sena  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Chhagan Bhujbal : लोकसभा, विधानसभेतही OBC ला आरक्षण पाहिजे, भुजबळांकडून मोठी मागणी; वडीगोद्रीमध्ये तोफ डागली, म्हणाले...

संतोष कानडे

OBC Reservation : ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातल्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं दहा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. यावेळी छगन भुजबळांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची मागणी केली.

भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडेंनी कोणालाही विरोध केला नव्हता, तरीही त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केलं. असं जर असेल तर मग आम्हालाही राजकीय आरक्षण पाहिजे. सरकारने लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं, असं भुजबळ म्हणाले.

जातनिहाय जनगणनेबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले की, जातनिहाय जनगणनेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मनोज जरांगे यांचं नाव न घेता भुजबळांनी आरोप केला की, तो तिकडे बसून जातीवाद करत आहे. त्यामुळे इथून पुढे ओबीसींना एकत्रित राहावं लागेल, नाहीतर आपलं आरक्षण टिकणार नाही.

भुजबळ काय म्हणाले?

  • खोटे दाखले घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

  • हातावर हात देऊन बसलात तर काहीही होणार नाही

  • आता मागे हटायटं नाही, लढा उभा करायचा

  • आपल्या मागण्यांबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा

  • त्यांना आमच्या ताटातलं देऊ नका

  • मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, आमचा पाठिंबा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT