Muktainagar esakal
महाराष्ट्र बातम्या

सर्वांत लांब पल्ल्याची दिंडी; मुक्ताईनगर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखीचे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : टाळमृंदुगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत आषाढी एकादशीच्या वारीसाठी येथील श्री संत मुक्ताई पालखीचे आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. कोरोनाचा निर्बंधामुळे दोन वर्षांपासून खंडीत पडलेल्या या दिंडी सोहळ्याला भाविकांचा यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या दिंडीचे ३१३ वे वर्ष असून महाराष्ट्रातील सर्वांत लांब पल्ल्याची दिंडी म्हणून या दिंडीची ख्याती आहे. दिंडीचा पुढील मुक्काम सतोड येथे होणार आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान संतश्रेष्ठ मुक्ताई माऊलीच्या दिंडीला दिला जातो. सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या पालखी दिंडीची सुरवात कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताईंच्या जुन्या मंदिरापासून करण्यात आली. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांची दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे.

मान्यवरांकडून पूजन

पालखी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, खासदार रक्षा खडसे, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन रोहिणी खडसे, संत तुकाराम महाराजांचे वंशज तथा देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे बापूसाहेब मोरे, खंडव्याचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, मध्यप्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील, सुनील भंगाळे, डॉ. जगदीश पाटील, पालखी सोहळा प्रमुख तथा संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त सूर्यकांत मोरे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नगराध्यक्षा मनीषा पाटील, चंद्रकांत भोलाणे, ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, पंकज कोळी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी पहाटे संत मुक्ताईंची महापूजा, काकडा आरती झाली. सकाळी कीर्तनसेवा होऊन मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर हरिनामाच्या गजरात पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.

लांब पल्ल्याची दिंडी

आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठल रखुमाईसह संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत तुकोबारायांच्या भेटीसाठी मुक्ताई या पालखीच्या माध्यमातून जातात, अशी वारकऱ्यांची भावना आहे. महाराष्ट्रातील सर्वांत लांब पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईच्या दिंडीची ओळख आहे. ही पालखी दिंडी कोथळी गावातील मुक्ताईंच्या जुन्या मंदिरापासून निघाल्यानंतर खानदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करीत ३३ दिवसांत तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते. तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताईंची निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांसोबत बहीणभावाची भेट घडविली जाते. यावेळी संत मुक्ताईला साडीचोळीचा आहेर भावांकडून दिला जातो. पंढरपूरमध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो.

पुस्तकाचे प्रकाशन

पालखी सोहळ्याच्या प्रस्थाननिमित्त युवा संत तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे लिखित ‘संत मुक्ताई पालखी सोहळा’ या पुस्तकाचे प्रकाशन खासदार रक्षा खडसे, श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब मोरे यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT