devendra fadnavis comment on aurangzeb social media crime offence Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: मुंबई-पुण्यात कंत्राटी पोलिसांची भरती? देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

Devendra Fadanvis: मुंबई आणि पुणे शहरात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जातं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis in maharashtra legeslative assembly

मुंबई -मुंबई आणि पुणे शहरात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जातं होतं. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. मुंबई आणि पुणे संवेदनशील शहरे आहे. याठिकाणी कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती होणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते विधानसभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही प्रकारे पोलिसांची कंत्राटी भरती होणार नाही. पोलिसांची 10 हजार पदे सध्या मुंबई-पुणे शहरात रिक्त आहेत, नवीन भरती होईपर्यंत दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. नवीन पोलिस प्रशिक्षित होईपर्यंत पोलिस दलातील इतर पोलिस मुंबई-पुणे शहरासाठी वापरले जातील. त्यांचा कालावधी अकरा महिन्यांचा असेल. पुणे-मुंबई संवेदनशील शहरे आहेत. त्यामुळे बाहेरच्या कंत्राटदारांकडून भरती केली जाणार नाही.

राज्यात पोलिस भरती सुरु करण्यात आली आहे. 18000 पोलिसांची भरती केली जाईल. त्यामुळे राज्यात पोलिस मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. 1960 नंतर पहिल्यांदाच पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना केली जाणार आहे. आता प्रत्येक स्टेशनला किती पोलिस अधिकारी पाहिजेत, किती कर्मचारी हवेत, किती लोकांमागे एक स्टेशन हवे, हे निश्चित केलं जाणार आहे. 1960 च्या लोकसंख्येनुसार नाही तर 2023 च्या लोकसंख्येनुसार पुनर्रचना केली जाणार आहे.18522 पदांना सुधारतील आकृतीबंधानुसार मान्यता दिली आहे, असंही फडणवीस म्हणाले.

महिला सुरक्षा समिती स्थापन केली आहे .महिलांवरील अत्याचार प्रकरणे हताळण्यासाठी 27 न्यायालये आणि 86 जलद गती न्यायालये स्थापन्यात आली आहेत. बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत प्रकरणासाठी 138 विशेष न्यायालये स्थापन केली आहेत. बलात्काराच्या प्रकरणात 60 दिवसात आरोपपत्र दाखल केले जात आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या ठिकाणी दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती फडणविसांनी विधानसभेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT