नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल औरंगाबाद येथे सभा झाली, या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली, दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत यांनी साधी विकास सोसायटी कधी काढली नाही असा टोला लगावला.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, जे लोकांच्या मनात विष कालवायचं प्रयत्न करतायत त्या व्यक्तीनं कुठली शिक्षणसंस्था काढली का? की सुत गिरणी उभी केली. काय काम केलं मला सांगा, दुसऱ्यांची संस्था उभा करायला मदत तरी केली? कधी शब्द खर्ची केला, साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्ठ्यानी, या सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील, असा टोला देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.
योगीनी फक्त मशिदीवरचे भोंगे बंद केले का?
अजित पवार पुढे म्हणाले की, नुसती उचलली जिभ लावली टाळ्याला, माणसाचे संसार उभे करायला डोकं लागतं, धुडगूस घालायला अक्कल लागत नाही, असा टोला त्यांनी लागवला. पुढे बोलताना त्यांनी सारखं नाव सांगतात योगीनं असं केलं योगीनं तसं केलं, ठिक आहे त्यांनी केलं असेल, त्यांनी काही भोंगे बंद केले पण फक्त मशिदीवरचे भोंगे बंद केले नाहीत मंदिरावचे देखील भोंगे बंद केले आहेत असे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, आपल्याकडे काकड आरती पाच वाजता असते रात्री जागरण गोंधळ असतो, उद्या फतवा काढायचा म्हणलं तर १० वाजता बंद करावा लागेल. त्याला कोण जबाबदार आहे. जोपर्यंत संमतीनं चाललेलं आहे तोपर्यंत आपण डोळेझाक करतो. कशाकरता वातावरण खराब करण्याचं काम होतंय.
डिझेल पेट्रोल गॅस सिलेंडरच्या किंमती वाढतायत कालच्या भाषणात त्याबद्दल काही सांगितलं? शेतकऱ्यांचा उस जाणे बाकी आहे त्याबद्दल काही बोलले? उष्णतेची लाट आहे त्याबद्दल काही सांगितल? असा सवाल त्यांनी विचारला. लोकांची दिशाभूल करण्याचं काम आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही, राजकीय स्वार्थापाटी समाजत दरी पाडण्याचं काम जाणीपूर्वक केला जातोय.
ज्यांनी शिवाजी महाराजांचा वापर राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी केला ते आज शरद पवार यांना विचारताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच नाव का घेत नाहीत, त्यांना मला सांगायचंय ते नावचं घेत नाहीत तर त्यांच्या विचारांवर चालण्याचं काम ते करतात. छत्रपती आमच्यानसानसात आहे, कुण तुकडोजी आम्हाला विचारतो असे देखील पवार यावेळी म्हणाले.
भाषण ही नौटंकी आहे, नकलाकार आहे की भाषण करायला आलेत, सगळ्यांनाच सकळं बोलता येत, पण भाण ठेवायचं असतं, शब्द चूकला तर आपण माफी मागतो, यांनी सगळं सोडून देऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातो असे अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी यातून आपल्या रोजीरोटीचा, मुलांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार नाही, इथलं वातावरण खराब झालं तर गुंतवणूक येणार नाही स्थानिकांना काम मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असे देखील पवार यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.