Mumbai High Court Sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई उच्च न्यायालयात तातडीने धाव घेऊनही नारायण राणेंना दिलासा नाही

ठाकरे यांच्याबाबत कानफटवणारे विधान करणार्या राणे यांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) तातडीने धाव घेऊनही कोणताही दिलासा मिळाला नाही. रजिस्ट्रार कार्यालयात रितसर कार्यवाही करुन मग अर्ज करा, असे न्यायालयाने त्यांना सुनावले आहे. त्यामुळे बुधवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

ठाकरे यांच्याबाबत कानफटवणारे विधान करणार्या राणे यांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी पुणे, महाड आणि नाशिक येथील फिर्यादी रद्दबातल करण्याची मागणी करणारी रिट फौजदारी याचिका राणे यांनी एड अनिकेत निकम यांच्यामार्फत आज दुपारी तातडीने उच्च न्यायालयात करण्यात आली. राणे यांना अटकेपासून दिलासा द्यावा आणि त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. पोलीस त्यांना अटक करायला आले आहेत, असे निकम यांनी खंडपीठाला याचिकेचा उल्लेख करताना सांगितले.

मात्र याचिका दाखल करताना पूर्ण कागदपत्रे आणि अधिक्रुत क्रमांक दाखल न केल्यामुळे न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यासाठी नकार दिला. प्रत्येकाला याचिका दाखल करण्याची रितसर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पहिल्यांदा रजिस्ट्रार विभागात याबाबत अर्ज दाखल करा, असे खंडपीठाने सुनावले. रजिस्ट्रार कार्यालयाची कामे आम्हाला करायला सांगू नका, असेही खंडपीठ म्हणाले. राणे यांच्या वकिलांनी दुपारी आणि न्यायालयाचे कामकाज संपताना दोन वेळा तातडीचा दिलासा मिळण्यासाठी लगबगीने प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी न झाल्यामुळे आता बुधवारी पुन्हा यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राणे यांना अटक करण्याआधी पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली नाही. त्यांना अटकेची पूर्वकल्पना किंवा चौकशीचे समन्स बजावले नाही, असा आरोप निकम यांनी केला. तसेच त्यांच्याविरोधात केलेल्या फिर्यादींमध्ये शिक्षेची तरतूद सात वर्षापेक्षा कमी आहे, त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण मिळू शकते असा दावा त्यांनी केला. मात्र खंडपीठाने आज यावर सुनावणी घेण्यासाठी नकार दिला.

त्यापूर्वी रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. संबंधित मूळ तक्रार नाशिकमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे या अर्जाची दखल घेऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. नाशिकमधील शिवसेना शहर शाखाप्रमुखाने नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर राज्यात अन्यत्रदेखील अनेक एफआयआर दाखल झाले आहेत. भादंवि 500 (मानहानी), 505(2) (खोडसाळपणा), 153-ब (सामाजिक एकात्मता भंग करणे आणि द्वेष पसरविणे) इ गुन्हे राणे यांच्या विरोधात नोंदविण्यात आले आहेत. नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी फिर्याद दाखल झाल्यानंतर लगेचच राणे यांच्या अटकेचे आदेश जारी केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या स्वातंत्र्य दिनासंबंधित भाषणाबाबत राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT