Anand Mahindra Esakal
महाराष्ट्र बातम्या

देवराष्ट्रेतील दत्तात्रयच्या कारनाम्यावर 'महिंद्रा' फिदा

मिनी जिप्सीचा घडवला अविष्कार, बोलेरो गाडी देण्याची आॅफर

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे, (सांगली): देवराष्ट्रे (Devarashtre) हे खरेतर देशाचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे जन्मस्थान. हेच देवराष्ट्रे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते वेगळया कारणाने आणि कारनाम्याने. हा कारनामा केला आहे. दत्तात्रय लोहार (Dattray Lohar) यांनी. त्यांच्या मुलगीने चारचाकी गाडी घेण्याची मागणी केली. आपल्या मुलगीच्या हट्टाखातर त्यांनी मग डोक लढवल आणि कारनामा केला. त्यांनी चक्क मिनी जिप्सी (Mini Gypsy) बनवून आपल्या मुलीला अनोखी गिफ्टच दिलीय. त्यांच्या या कारनाम्याची चर्चा सोशल मीडियावरही आता सुरू आहे. त्यात नेहमी चांगल्या व सकारात्मक गोष्टींना सातत्याने पाठिंबा आणि आपल्या सहह्दयतेने कित्येकांची मनं जिंकणाऱ्या आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असणाऱ्या उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनाही दखल घेतली आहे. या कारागिराने बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शनास ठेवीन, असे ट्विट करत एकप्रकारे दत्तात्रय लोहार यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली आहे.

अभयारण्याबरोबरच आता देवराष्ट्रेमध्ये फॅब्रिकेशन व्यवसायातील एका कारागिराने चक्क मिनी जिप्सी बनवली असून हा विषय पंचक्रोशीत मोठ्या औत्सुक्याचा ठरला आहे.

देवराष्ट्रे देशाचे उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे हे जन्मगाव. या गावच्या मातीत बरीच माणसं मोठ्या हुद्यावर आहेत. तर काही व्यवसायात तर कोणी साहित्य, कलाकार क्षेत्रात भरारी घेतली आहे. सध्या देवराष्ट्रे गावाचे नाव जिल्ह्यात, राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. अभयारण्याबरोबरच आता देवराष्ट्रेमध्ये फॅब्रिकेशन व्यवसायातील एका कारागिराने चक्क मिनी जिप्सी बनवली असून, हा विषय पंचक्रोशीत मोठ्या औत्सुक्याचा ठरला आहे. देवराष्ट्रे गावातील सुपुत्र दत्तात्रय लोहार यांनी मिनी चारचाकी जिप्सी तयार केली आहे. विशेष म्हणजे दत्तात्रय हा अशिक्षित आहे. त्याने मिनी चारचाकी तयार केली आहे. आयुष्यात येऊन आपली चारचाकी गाडी असावी, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. आताच्या स्थितीत चारचाकी खरेदी करणे सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. फायब्रिकेशनचा त्याचा व्यवसाय आहे. ते काम ही तो बघून शिकला आहे. आता फॅब्रिकेशन व्यवसायात उत्तम कारागीर म्हणून त्याची ओळख आहे.

दत्तात्रय याची स्वतःची दुचाकी गाडी होती. एक दिवस त्यांच्या मुलीने आपल्याला चारचाकी गाडी घ्या, अशी इच्छा व्यक्त केली. त्याच्या स्वतःच्या दुचाकींची मिनी चारचाकी जिप्सी गाडी करावी. मनात निश्चय केला. आपल्या दुचाकीचे सर्व पार्ट वेगळे केले. मिनी दुचाकी करण्यास सुरुवात केली. कैक वेळा अपयश आले, हे होणार नाही सोडून द्यावे, असे कित्येक वेळा वाटायचे. मात्र, न हरता दत्तात्रय याने मिनी चारचाकी तयार केली आहे.

कोरोना काळात त्याने ही मिनी चारचाकी तयार करण्यास सुरवात केली. मिनी बस चालवण्यासाठी ड्रायवरची जागा डाव्या बाजूस केली आहे. गाडीची पुढील दोन चाके रिक्षाची आहेत. पुढे दोन मागील बाजूस दोन बसतील एवढी जागा गाडीत आहे. परिस्थिती बेताची असल्याने गाडी बनवताना बहुतांश वस्तू जुन्या वापरल्या आहेत. अजूनही गाडीचे खूप काम करायचे आहे.

दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली मिनी चारचाकी घेऊन फिरवताना लोक त्याच्या गाडीकडे कुतुहलाने पाहतात व विचारतात तुम्ही कुठले गाडी, कशी बनवली, यावर त्यांचे उत्तर असते मी यशवंतराव चव्हाण यांच्या गावचा आहे. त्याची मिनी चारचाकी जिप्सी गाडी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दत्तात्रय लोहार याचा आदर्श युवकांनी घेतला पाहिजे. परिस्थिती कशी असो, कोणतेही काम अवघड असले तरी मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर ते काम पूर्ण होत, हे आज दत्तात्रय यांनी दाखवले.

-दत्तात्रय लोहार

मिनी जिप्सी बनवण्यासाठी मला खुप मेहनत घेतली आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य एकवेळ जेवत होते. माझी परिस्थिती बेताची आहे. फॅब्रिकेशन दुकानातून घरचा खर्च कसाबसा निघतो. त्यात मुलीने आपल्याला गाडी आणावी, अशी इच्छा व्यक्त केल्यावर मी मिनी जिप्सी तयार केली आहे. अजून गाडीचे काम खूप करायचे आहे. परंतु, पैसे नसल्याने काम थांबवले आहे. गाडी पाहण्यासाठी राज्यातून येत आहेत. हजारो फोन येत आहेत. लवकर माझी मिनी जिप्सी तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT