मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. मात्र बारा तासाच्या आत त्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान या बदल्याच्या प्रकरणावर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बदल्याच्या प्रकरणावर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. पोलिसांच्या बदल्याच्या स्थगितीने लक्ष वेधून घेतले आहे. यामागचे कारण काय असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मागच्या वेळी जेव्हा 10 DCP अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तेव्हा बदली घोटाळा समोर आला होता असं ते बोलताना म्हणाले. दरम्यान काल राज्याच्या गृहखात्याने पोलिस खात्यात बदल करताना पोलिस अधिकाऱ्यांत्या बदल्या आणि पदोन्नत्या जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक येथील अधिकाऱ्यांचा सामावेश होता. पण १२ तासाच्या आत त्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या अधिकाऱ्यांची झाल्या होती बदल्या
1. लखमी गौतम IPS Lakhmi Gautam (पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
2. संदीप कर्णिक IPS Sandeep Karnik (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई)
3. सत्य नारायण IPS Satya Narayan (अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई)
4. प्रविणकुमार पडवळ IPS Pravin Kumar Padwal (अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)
5. एस. जयकुमार IPS S. Jayakumar (अपर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर – वसई – विरार पोलीस आयुक्तालय)
6. निशिथ मिश्रा IPS Nishith Mishra (अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई)
7. सुनिल फुलारी IPS Sunil Fulari (अपर पोलीस आयुक्त गुन्हे, नागपूर शहर)
8. संजय मोहिते IPS Sanjay Mohite (पोलीस उप महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई)
9. सुनिल कोल्हे IPS Sunil Kolhe (सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
10. दत्तात्रय कराळे IPS Dattatraya Karale (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, ठाणे शहर)
11. प्रविण आर पवार IPS Pravin R Pawar (अपर पोलीस आयुक्त (प्रशासन, ठाणे शहर)
12. बी. जी. शेखर IPS B. G. Shekhar (पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र)
13. संजय बाविस्कर IPS Sanjay Baviskar (पोलीस उप महानिरीक्षक, रा.रा. पोलीस बल, पुणे)
14. जयंत नाईकनवरे IPS Jayant Naikanvare (पोलीस उप महानिरीक्षक व्ही. आय. पी. सुरक्षा, मुंबई)
15. डॉ. रविंद्र शिसवे, सह पोलिस आयुक्त पुणे
या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द
महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. पण, आज सकाळी त्यांच्या बढती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्याचं कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं आहे.
या अधिकाऱ्यांच्या बदली रद्द करण्यात आल्यामुळे विरोधीपक्षनेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.