Devendra Fadnavis Replied Sharad Pawar e sakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रपती निवडणूक : पवारांच्या भूमिकेबाबत फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी (Presidential Election ) निवडणूक पार पडणार आहे. त्यापूर्वी पश्मिच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काल विरोधकांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. शरद पवारांच्या या भूमिकेवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar)

फडणवीस म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी न घेणं हा शरद पवारांचा व्यक्तिगत निर्णण असले आणि तो त्यांनी विचारपूर्वक घेतला असेल. राष्ट्रपतीपदाकरता एनडीएजवळ आणि त्यांना मदत करणारी एकूण मत जर बघितली तर, एनडीए जो उमेदवार ठरवेल तो उमेदवार निवडून येणार हे कुठल्याही राजकीय नेत्याला समजू शकतं. शरद पवारांनी यातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या प्रकृतीचं कारण सांगितलेलं असून आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे.

भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू; 'मिशन 48'ची घोषणा

लोकसभेच्या 2024 निवडणुकांसाठी भाजपने (BJP) मोर्चेबांधणी केली असून 'मिशन 48' ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी भाजप तयारी करत आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

"पुढच्या 17 ते 18 महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसं काम करायचं असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचं आहे. राज्यात असलेल्या 48 पैकी 48 लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत." असं मत फडणवीस म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT