Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: 'अजित पवारच खरे हिरो'; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadanvis: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी आज निवड झाली आहे. त्यांचे नाव विधानसभेत आज घोषित करण्यात आले

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadanvis On ajit pawar:

मुंबई- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी आज निवड करण्यात आली. त्यांचे नाव विधानसभेत आज घोषित करण्यात आले. त्यानंतर विधानसभेतील सर्व पक्षीय नेत्यांनी वडेट्टीवार यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार 2019 चे खरे हिरो असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझा नंबर लागतो असंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, 2019 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक विक्रम आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सत्ता परिवर्तन केले आणि मुख्यमंत्री झाले. ते चांगल्या पद्धतीचे काम करत आहेत. त्यामुळे ते होरो आहेत. पण, 2019 सालचे खरे हिरो दादा (अजित पवार ) आहेत. 2019 साली ते माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे 2019 चे खरे हिरो ते आहेत.

दादांच्या खालोखाल मी आहे. मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर विरोधी पक्षनेता झालो आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झालो. आता यात काही बदल नाही. आम्ही ज्या पदावर आहोत त्याच पदावर राहणार आहोत. आम्ही चांगले काम करत राहू. आम्ही सगळे समाधानी आहोत, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांना शुभेच्छा देताना म्हटलं की, 'ते आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतील. वडेट्टीवारांचा आवाज मोठा आहे, त्यामुळे त्यांना माईकची गरज पडणार नाही. सुधिर मुनगंटिवार यांच्याप्रमाणेच त्यांचा आवाज आहे. वडेट्टीवार हे संवेदशील आणि जमिनीशी जोडले गेलेले नेते आहेत. त्यांच्या वडिलांकडून त्यांना वारसा मिळाला आहे. त्यांचे वडिल सरपंच होते. धडाडीचा आणि कडक निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांचाच वारसा वडेट्टीवार यांच्याकडे आलाय.'

वडेट्टीवार शिवेसेनेच्या संपर्कात आले. 'घर तेथे शिवसैनिक' या बाळासाहेबांच्या स्वप्नासाठी त्यांनी काम केले. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांना वेगवेगळ्या संधी मिळाल्या आहेत. त्या संधीचा फायदाही त्यांनी करुन घेतला. विदर्भातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. चिमूर नंतर ब्रह्मपुरीमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि सलग 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक जिंकली, असं फडणवीस म्हणाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

त्याने कधीही माझ्यावर शंका... मृणाल दुसानिसने पतीच्या त्या गोष्टीचं केलं कौतुक, म्हणाली- माझ्याबद्दल पझेसिव्ह असणं

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

SCROLL FOR NEXT