devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadanvis: हिरे दागिने उद्योगामुळे राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरवर जाईल

सकाळ डिजिटल टीम

जीजेईपीसी च्या सहकार्याने नवी मुंबई येथे उभारलेल्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क मुळे या क्षेत्रातील राज्याच्या निर्यातीचे लक्षत गाठले जाईलच, पण राज्याची अर्थव्यवस्था देखील एक लाख कोटींवर जाण्यास हातभार लागेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल तर्फे आयोजित इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो मध्ये ते बोलत होते. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शहा, उपाध्यक्ष किरीट भन्साळी आदी मान्यवर हजर होते.

सन २०३० पर्यंत देशातून ७५ अब्ज अमेरिकी डॉलर रकमेच्या हिरे व दागिने निर्यातीचे लक्ष पंतप्रधानांनी ठेवले आहे. जीजेइपीसी च्या प्रयत्नांमुळेच ते साध्य होईल. असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

सीप्झ मध्ये फक्त १७ महिन्यांत उभारलेल्या कॉमन फॅसिलिटी सेंटर मुळे निर्यात अत्यंत सोपी होईल. तर नवी मुंबईच्या ज्वेलरी पार्क मुळे हिरे व दागिन्यांच्या निर्यातीची वेगळीच व्यवस्था उभी राहील व त्यावेळी या क्षेत्रात प्रमुख निर्यातदार हे स्थान महाराष्ट्र मिळवेल. या क्षेत्रात राज्य सरकार नवी गुंतवणूकही करणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर वर जाण्यात जीजेईपीसी देखील हातभार लावेल. हिरे, दागिने उद्योगच्या निर्यातीसाठी महाराष्ट्रात नवी यंत्रणा तयार करण्यासही सरकार साहाय्य करेल, असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले. 

जीजेइपीसीने ग्रामीण भागातही हिरे व दागिने उद्योग उभारण्यास साहाय्य करावे, अशी अपेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. तर नवी मुंबई येथील ज्वेलरी पार्क उभे राहिल्यानंतर येथे परदेशातून मोठी गुंतवणूक आणली जाईल, अशी ग्वाही जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शहा यांनी दिली.

या ज्वेलरी पार्क मुळे स्वस्त वीज तर मिळेलच पण कार्यक्षमतेने काम होऊन खर्च कमी होतील व चांगले वातावरण निर्माण होईल, असेही ते म्हणाले. तर मुंबईतील सिप्झमध्ये उभारलेल्या कॉमन फॅसिलिटी सेंटर मुळे उत्पादनात वाढ होईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळेल आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT