मुंबई : विद्यापीठ (University) सुधारणा विधेयकावरून सभागृहात ठाकरे सरकारवर (Thackeray Government) आगपाखड केलेल्या विरोधकांनी हा मुद्दा हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला असून, कायद्यातून सरकारला काय साधायचे हे दाखवून देत, नव्या वर्षात राज्यभरातील विद्यापीठांत आंदोलन करण्याचा निर्णय विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज जाहीर केले. उच्च व तंत्रशिक्षण खात्याच्या कामावरही फडणवीस यांनी सडकून टीका केली. यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार असून, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विधेयकाला विरोध करून सभात्याग केलेल्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. हे विधेयक आणण्याचा सरकारचा हेतू, त्याचे परिणाम यावर फडणवीस यांनी बोट ठेवले. फडणवीस म्हणाले, ‘‘या कायद्यामुळे उच्च शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपतींचा दर्जा मिळणार आहे. सिनेटचा अधिकारही त्यांना जाणार आहे. विद्यापीठातील प्रशासन आणि शैक्षणिक धोरणे प्रकुलपती म्हणजे मंत्री राबविणार आहेत. त्यामुळे कुलगुरू हे पद ‘रबर स्टॅम्प’ सारखे होणार आहे.’’
... त्याची माहिती काँग्रेसला
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कोणाला नको होती, हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्याकडेच फडणवीस यांनी बोट दाखविले. यानिमित्ताने महाविकास आघाडीतील घटकपक्षांत मतभेद असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
हा तर काळा दिवस
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतांना पदवीप्रदान समारंभाचा ‘ड्रेस’ खूप आवडत असल्यानेच त्यांनी विद्यापीठाचे अधिकार आपल्याकडे ठेवल्याचा चिमटा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामंतांना काढला. विद्यापीठांवर शंभर टक्के कब्जा करणारा हा कारभार असल्याचा मुद्दाही फडणवीस यांनी उपस्थित केला. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी विधेयक मांडून ते मंजूर केले आहे. सभागृहात काळा दिवस ठरला; हे सरकार घाबरट आणि पळपुटे असल्याचे दिसून आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.