Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics Update : देवेंद्र फडणवीस रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी; राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट?

अंकिता खाणे (Ankita Khane)

Devendra Fadnavis Latest News : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरून सध्या राजकारण चांगलचं तापलं आहे. अशातच राज्याच बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये वारंवार बैठका होतं असल्याचं दिसून येत आहे.

तर काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. फडणवीस रात्री इतक्या उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यामूळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या रात्रीच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. परंतु राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे.

एकीकडे अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीमध्ये अजित पवार यांच्या मागण्या 90 टक्के मान्य झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत. तर खातेवाटप आज उद्यामध्ये जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असताना काल रात्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या विषयीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमद्धे सातत्याने बैठका होत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.(Latest Marathi News)

अद्यापही बैठकांचं संत्र सुरुच आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची काल (गुरुवारी) सकाळीसुद्धा ‘वर्षा’वर बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आता रात्री उशिरा फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक पार पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल ठाण्यात कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते ठाण्यातील निवासस्थानी आले होते. तर भाजपचे काल भिवंडीत एक दिवसीय शिबिर होतं या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. याबाबतचे वृत्त 'टिव्ही ९ मराठी'ने दिले आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन नवे संघ! मिळणार New Champion

Sakal Podcast: विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑक्टोबर 2024

आजचे राशिभविष्य - 19 ऑक्टोबर 2024

Mumbai Local News: पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळादरम्यानची लोकल वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT