Chandrashekhar bawankule On Maharashtra CM Face
Chandrashekhar bawankule On Maharashtra CM Face Esakal
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: फडणवीस हे मुख्यमंत्री चेहरा होऊ शकतात का? प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या सूचक उत्तरामुळे खळबळ

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचा मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा असेल? असा प्रश्न राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या मनात उपस्थित होत आहे.

अशात भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच या विषयावरील कोंडी फोडत म्हटले की, विधानसभा निवडणुकीत महायुती मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कोणाला प्रोजेक्ट करेल यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात का?

महाराष्ट्रात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी 'महायुती'चा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल? याबाबत चंदशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि मित्रपक्ष योग्य वेळी निर्णय घेतील. ते पुढे म्हणाले की, राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीस हेच पक्षाचे नेते राहतील.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री चेहरा होऊ शकतात का? असे विचारले असता बावनकुळे यांनी महायुतीचे राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडवणे आणि विकासाला प्रधान्य आहे, असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले की, “जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा भाजपचे केंद्रीय नेतृत्व, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आणि महायुतीचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र निर्णय घेतील.”

लोकसभा निवडणुकीच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. पण तो आता त्यांनी बदलला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दिल्लीत भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीत सहभागी होऊन परतलेल्या बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांना फडणवीस हे सत्ताधारी आघाडीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का, असे विचारले असता बावनकुळे म्हणाले की, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि आघाडीचे सहकारी निर्णय घेतील. फडणवीस हेच राज्यात त्यांच्या पक्षाचे नेते राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

Ladaki Bahin Scheme: महिलांच्या मागणीनंतर 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! अजित पवारांची सभागृहात घोषणा

Hathras stampede: सत्संगातील मृतदेहांचा खच पाहून आला हृदयविकाराचा झटका, जवानाचा जागेवरच मृत्यू...

IPL 2025 Auction : रिटेंशनवरून कोणताही तोडगा नाही; खेळाडू संख्येवरून फ्रेंचायजी एकमेकांशीच भिडले

Hathras stampede: हाथरसमध्ये हाहाकार! "माझी मुलगी कुठेच सापडली नाही", आईची शोधाशोध...वाचा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT