महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik : मुख्यमंत्री देखील नाराज? फडणवीसांच्या लेटर बॉम्बनंतर महायुतीमध्ये अजित पवार पडले एकटे

फडणवीसांनी अजित पवारांना लिहीलेलं ते पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लिहील्याची माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दम्यान काल सुरु झालेल्या या अधिवेशनात पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. यानंतर सभागृहातील विरोधी पक्षांनी मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला कोंडीत पडकल्याचं पाहायला मिळालं. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित मलिक सत्तेत सहभागी होण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान आता फडणवीसांनी अजित पवारांना लिहीलेलं ते पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लिहील्याची माहिती समोर आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाजात सहभागी झालेले नवाब मलिक सत्ताधारी पक्षांच्या बाकावर जाऊन बसले. याचे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात पडसात उटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या सत्तेतील पाठींब्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कालच पाहणी दौऱ्यादरम्यान चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला मुख्यमंत्री शिंदे यांचा पाठींबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्या मुद्द्यावर महायुतीत अजित पवार एकटे पडल्याचे चित्र आहे.

अजित पवार काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मलिकांसंबधीची भूमिका स्पष्ट करत लिहीलेल्या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहलेलं पत्र मला मिळालं आहे. ते मी वाचलं आहे. नवाब मलिक हे काल पहिल्यांदांच सभागृहात आले होते. आम्ही महायुती सरकारसोबत गेल्यानंतर ते पहिल्यांदाच बाहेर आले आहेत. त्यांची भूमिका काय आहे, ते ऐकल्यानंतर मी माझी भूमिका सांगेन असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. तसेच सभागृहात कोणी कुठे बसायचं हे सांगणं माझा अधिकार नाही, असेही अजित पवार म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस पत्रात काय म्हणाले होते?

मलिकांनी सत्तेत सहभागी होण्याबाबत फडणवीस अजित पावारांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "ज्या पद्धतीचे आरोप नवाब मलिकांवर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे, सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे.

आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT