Uddhav Thackeray, Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Fadnavis on Budget: "हा थापांचा नाही तर, माय-बापांचा अर्थसंकल्प"; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अंतरिम अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. या अर्थसंकल्पात थापा मारण्यात आल्या असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला उत्तर देताना हा थापांचा नव्हे तर आपल्या माय-बापांचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis comment on Budget 2024 Maharashtra Monsoon Session taunt on Uddhav Thackeray criticisms)

फडणवीस म्हणाले, "अजित पवारांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी प्रगतीशील सर्वसमावेशक असं बजेट आज मांडलं. शेतकरी, महिला युवा, मागासवर्गीय, सर्व घटकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, हा थापांचा अर्थसंकल्प आहे पण हा माय-बापांचा अर्थसंकल्प आहे"

आता विरोधीपक्ष बोलत होते त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांचे चेहरे उतरलेले होते, केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास निर्माण करणार आहे. आम्ही जे जे कबूल केलं आहे ती प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करुन दाखवून देऊ. हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुकीचा नाही, असं सांगताना विरोधक आपल्याला काय बोलायचंय हे आधीच लिहून आणतात, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबई परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Mumbai School Holiday: मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर! शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबईत मुसळधार! लोकलसेवेवर मोठा परिणाम, ट्रेन तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशीराने, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Politics: लाडकी बहीण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य, भाजप आमदारामुळे महायुतीचं सरकार अडचणीत?

Rain Update: पालघर आणि नाशिकसाठी रेड अलर्ट, तर मुंबईसह पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी, वाचा 26 सप्टेंबरला कशी असेल पावसाची स्थिती?

SCROLL FOR NEXT