Devendra Fadnavis Uddhav-Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

...तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही का? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalized) केल्याची घटना घडली. यावरून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना (Shivsena) चांगलीच आक्रमक झाली होती. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Maharashtra CM Uddhav Thackeray) देखील याबाबत भाष्य केले होते. त्यावरूनच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य फिरविण्यात आलं' -

शिवाजी महाराजांचा अपमान कर्नाटक किंवा महाराष्ट्र कुठल्याही राज्यात सहन केला जाणार नाही. त्यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. कर्नाटकमधील मोठ्या व्यक्तीच्या पुतळ्याचा देखील अपमान करण्यात आला आहे. कोणाचाही अपमान झाल्यास तो चुकीचा आहे, असं ते म्हणाले होते. मात्र, त्यांचं वक्तव्य कसं फिरविण्यात आलं हे त्यांनी पुराव्यासहीत सिद्ध केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'...तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही का?' -

कर्नाटकमध्ये महाराजांचा अपमान झाल्यानंतर आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील भाष्य केलं. पण, सत्तापक्षातील एक आमदार महाजांच्या अंगावर चढतात त्यावेळी महाराजांचा अपमान होत नाही का? याबाबत कोणीच बोललं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, संजय राऊत कोणीच भाष्य केलं नाही. महाराजांचा अपमान निवडक असतो का? असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

शिवथाळीमध्ये भ्रष्टाचार -

शिवथाळी हा उपक्रम केवळ सत्तापक्षाच्या आणि शिवसेनेच्या काही नेत्यांसाठी त्यांचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी केलेली योजना आहे. शिवभोजन योजनेत मोठा घोटाळा झाला असून हे घोटाळे आम्ही बाहेर काढणार आहोत. महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या शिवथाळीमध्ये भ्रष्टाचार होत आहे, तो महाराजांचा अपमान नाही का? असा सवाल उपस्थित करत शिवभोजन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी फडणवीसांनी केली.

महाराजांच्या पुतळ्यावर चढून हार घालणारे आमदार कोण? -

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा बसविण्यात आला. यावेळी वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी पुतळ्याचं स्वागत करताना चक्क महाराजांच्या पुतळ्यावर चढून महाराजांना हार घातला. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीका देखील कऱण्यात आली होती. त्यानंतर स्वतः आमदार राजू नवघरे यांनी माफी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT