uddhav thackeray and devendra fadnavis  SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ''जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल'' फडणवीसांकडून महाभारताचे दाखले

संतोष कानडे

मुंबईः 'महाविजय अभियान २०२४' या कार्यक्रमाचं भिवंडी येथे आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमामध्ये बोलतांना बोलतांना देवेंद्र फडणवीसांनी २०१९मध्ये उद्धव ठाकरेंसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा पुन्हा उल्लेख केला. आपल्यासोबत बेईमानी झाली त्यामुळे महाभारतात कृष्णाने जी नीती वापरली तीच आपल्याला वापरावी लागेल, असं म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

2019 मध्ये पालघरची एक जागा आपल्या खासदारासहीत त्यांना (उद्धव ठाकरेंना) दिली होती. त्यानंतर युती झाली. ज्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल वारंवार ते सांगतात, त्याच खोलीत अमित शाह, उद्धव ठाकरे बसले होते. त्यानंतर मला बोलावलं. मग पत्रकार परिषदेत मी एकट्याने बोलायचं, हे ठरलं होतं. मी ते मराठीत बोलून दाखवलं, हिंदीत बोलून दाखवलं. वहिनी आल्या आणि उद्धवजी म्हणाले वहिनींसमोर बोलून दाखवा. मी त्यांनाही बोलून दाखवलं. तंतोतंत बोललो त्यानंतरच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक होत असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं शिवाय फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं आहे, हे ते म्हणालेले.

फडणवीस पुढे म्हणाले...

परंतु निवडणुकीनंतर मात्र ते बदलले. मुख्यमंत्री पद हवंय म्हणाले आणि सगळे दरवाजे उघडे आहेत असं म्हणाले. त्यानंतर काय झालं तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यानंतर आपल्याकडे राष्ट्रवादीची आपल्याला ऑफर आली. त्यानंतर काय झालं हे अजितदादांनी सांगितलंच आहे. खऱ्या अर्थाने २०१९ साली उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजित खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. मोदीजींचे मोठमोठे फोटो लावून त्यांनी मतं मागितले आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. हा खंजित उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खुपसलेला खंजित होता.

फडणवीसांनी दिले महाभारतातले दृष्टांत

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले, मला अमित भाईंनी एक गोष्ट अतिशय चांगली सांगितली. ते म्हणाले, देवेंद्र दहा अपमान सहन करु पण बेईमानी सहन करायची नाही. आपण जे करतोय, तो धर्म आहे. अधर्म नाहीये. महाभारताने आपल्याला हेच शिकवलं आहे. कृष्णाने कर्णाचे कवच कुंडलं काढून घेतली. गांधारीकडे दुर्याधनाला पाठवलं तेव्हा पातळ नेसायला लावलं... भीष्माला पराभूत करण्याकरीता श्रीखंडीला उतरवलं. सुदर्शन चक्राचा वापर करुन सुर्यास्त भासवला विरुद्ध बाजूच्यांचा संहार केला.अश्वत्थामा गेला हे सांगतांना कृष्णाने मोठ्याने शंख वाजवला, त्यामुळे द्राणाचार्यांना अर्धवट ऐकू आलं. हा अधर्म नाही ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. आपल्याला परित्राणाय साधूनाम लक्षात आहे, परंतु विनाशाय च दुष्कृताम् हे देखील लक्षात ठेवावंच लागेल.

''लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडले''

फडणवीस पुढे म्हणाले, कुठे कुठे कूटनीती वापरली तरच आपण युद्ध जिंकू शकतो, हे श्रीकृष्णाला माहिती होतं. लोक म्हणतात तुम्ही पक्ष फोडले, घर फोडले. परंतु याची सुरुवात कुणी केली? एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काल राजकारणात आलेले नाहीत. विचारपूर्वक आलेले आहेत. ज्या ज्या वेळी अन्याय होईल, त्या त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील. ज्या शिवसेनेशी युती झालीय ती इमोशनल युती आहे. २५ वर्षांची आमची मैत्री आहे. राष्ट्रवादीशी जी मैत्री केली ती राजकीय मैत्री आहे. पुढच्या दहा-पंधरा वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boycott on Election : महाराष्ट्रातील 10 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार,का घेतला हा निर्णय ?

गस्तीला गुलाबी जीपमधून आली अन् घेतलं चुंबन, महिला पोलिसाच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, प्रकरण काय?

Latest Maharashtra News Updates Live : अंधेरीतील भाजप नेते मुर्जी पटेल यांचा आज रात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता

RRB Recruitment 2024: रेल्वेत तीन हजार जागांसाठी मेगाभरती; बारावी पास असलेल्यांना संधी, शेवटचे दोन दिवस

Diwali Recipe : बुंदी-बेसनाच्या फंदात पडू नका, दिवाळीला अगदी झटपट होणारे हे लाडू बनवा

SCROLL FOR NEXT