Devendra Fadnavis lashed out at banks for refusing to give loans to farmers kharip hangam review meeting  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : ....तर थेट एफआयआर दाखल करा; खरीप हंगाम आढावा बैठकीत संतापले!

रोहित कणसे

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा बँकावर एफआयआर दाखल करा अशा आशयाचं विधान देखील त्यांनी केलं. आज, २४ मे रोजी करण्यात आलेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत फडणवीस संतापल्याचे पाहायला मिळाले.

खरीप हंगाम आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आणि सर्व जिल्ह्याधिकारी तसेच कृषी विभागाचे आधिकारी सहभागी झाले. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. बँका पीक कर्ज नाकारत असल्याने आधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना केल्या आहेत. जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असेही फडणवीस यांनी सुनावलं. एबीपी माझाने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज नाकारल्याचे प्रकार समोर आला होता. या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाई करावी असे आदेश संबंधीत आधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी देले आहेत.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या चालू वर्षीच्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, सुरेश खाडे, अतुल सावे, दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT