Devendra Fadnavis  sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्युट तयार करणार

दत्ता लवांडे

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निती आयोगाची बैठक झाली असून यामध्ये अनेक मुद्द्यांवर निती आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही प्रकल्पासाठी सहमती दर्शवली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचबरोबर निती आयोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असा आयोग तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

(Devendra Fadnavis Latest News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ATS च्या कामाचं कौतुक केलं असून "नक्षलवाद्यांच्या प्रमुखाला पकडण्यात आलं असून त्याला झारखंडच्या ताब्यात सोपवण्यात येत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांवर चाप बसणार आहे. या कामगिरीनिमित्त मी ATSचं कौतुक करतो" असं फडणवीस म्हणाले.

निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात इन्स्टिट्युट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तयार करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव सादर केला आहे. या इन्स्टिट्युटसाठी मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: समंती दर्शवली आहे. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराच्या नंतर या गोष्टीचा आम्ही निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिलं आहे.

संततधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यासाठी राज्य सरकारने याआधीच मदत जाहीर केली गेली आहे. काही जीआर निघाले आहेत आणि काही जीआर अजून निघणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT