Devendra Fadnavis on beed Violence MLA sandeep kshirsagar house burn Case maratha reservation  
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis :...तर बीडच्या घटनेत दोन दिवसात एसआयटी स्थापन करू; फडणवीसांचं सभागृहात वक्तव्य

विधीमंडळात संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

रोहित कणसे

बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत बीडमधील जाळपोळीचा मास्टरमाईंड शोधा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान फडणवीसांनी या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही घटना अतिशय गंभीर घटना आहे. जमावाने लोकप्रतिनीधींची घरे जाळली, जवळपास सर्वच पक्षांच्या लोकांवर हल्ले करण्यात आले. भाजप अध्यक्षांचं ऑफिस जाळलं, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेच्या गटावर हल्ला झाला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी मांडलेली व्यथा गंभीर आहे.

अशा प्रकारच्या घटना राडकरणापलीकडे जाऊन पाहिल्या पाहीजेत. कारण याचं राजकारण करायला लागलो तर मग महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था कधीही राहणार नाही. पहिल्यांदा घटना घडल्यानंतर त्यावेळी उपल्बध पोलीस फोर्स शक्य ती कारवाई करत होता. पोलीस फोर्सने कारवाई केली नसती, तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती. लोक जमा झाले होते त्यानुसार फोर्स कमी होता. बाहेरून पाठवलेला फोर्स पोहचेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या.

तपासानंतर, काही लोकं दोन-तीन ठिकणी आढळून आले. काही लोक चार-चार जागांवर आहेत. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोकं देखील पाहायला मिळत आहेत. माजलगाव आणि बीड येथे २७८ आरोपी आतापर्यंत अटक झाले आहेत. ज्यापैकी ३० जण सराईत गुन्हेगार आहेत. अजूनही माजलगाव येथील घटनेतील ४० गुन्हेगार फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. बीडमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील ६१ गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत, त्यांचा देखील शोध सुरू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काही लोकं म्हणत आहेत की, तुम्ही निष्पाप लोकांना पकडत आहात, पण ज्यांच्याविरोधात सबळ पुरावा आहे त्यांनाच पकडण्यात आलं आहे. पकडलेल्या आरोपींची चौकशी झाली आहे, त्यांचे व्हॉट्सअॅप,टेक्स मॅसेज आणि मोबाईल लोकेशन बघून ज्यांच्याविरोधात पुरावे सापडले त्यांना पकडण्यात आलं आहे, असेही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

पोलीसांची कारवाई याही पेक्षा जास्त व्हायला पाहिजे होती, पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि दंगल करणाऱ्यांची संख्या यात मोठी तफावत होती. नवीन फोर्स पाठवेपर्यंत यावर नियंत्रण मिळवणे कठीण गेलं. ठरवून हल्ले करण्यात आले होते का हेही लवकर समोर येईल. याच्यामागे मास्टरमाइंड आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे. फरार लोक पकडले गेले तर मास्टरमाइंड संदर्भातील शंकाचे निरसण होईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यासंदर्भातील आवश्यक कारवाई केली आहे. यामध्ये कुठलाही जात, धर्म, पक्ष न पाहाता कारवाई केली जाईले असे आश्वासन फडणवीस यांनी दिलं. आपण व्यक्त केलेल्या शंकांच्या दृष्टीने तपास सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.

जयंत पाटील यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश का दिले गेले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, याबाबत पालकमंत्र्यांशी एसआयटी स्थापन करण्याबाबत मी चर्चा केली होती, पण पोलिस प्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी एका लेव्हलपर्यंत चौकशी पूर्ण झाली आहे, नवीन अधिकारी आला तर चौकशीला वेळ लागू शकतो असं त्यांनी सांगितलं. माझी हरकत नाहीये. सभागृहाची इच्छा असेल तर यासंदर्भात दोन दिवसात एसआयटी स्थापन करू असे अश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संदीप क्षीरसागर काय म्हणाले?

विधीमंडळात झालेल्या चर्चेत आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीडमधली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. हल्लेखोरांनी मंदिरसुद्धा फोडली आहेत. माझ्या घरी जाळपोळ झाली, पंडितांच्या घरी दगडफेक केली तिथून बस स्थानकातही दगडफेक केली आणि मग ते निवांतपणे निघून गेले. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे, हे तपासणं गरजेचं आहे. छगन भुजबळ साहेबांनी घरी भेट दिली, आपले कौटुंबिक संबंध आहेत. परंतु एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही. इतर समाजाचाही संबंध नाही. ते गावगुंड होते, ते कुणाशी ना कुणाशी निगडीत होते, यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते कुणाशी बोलत होते ते लक्षात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT