Devendra Fadnavis on Buldhana Bus Accident says Samruddhi highway construction not cause of accident  
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : समृद्धीचं बांधकाम एकदम सेफ! बुलढाण्यातील अपघातानंतर फडणवीसांचं स्पष्टीकरण

रोहित कणसे

बुलढाण्यातीत समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा होपपळून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या अपघातानंतर समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील महामार्गावरील वेग मर्यादेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्ग एकदम सुरक्षित असल्याचे म्हटले आहे

फडणवीस म्हणाले की, समृद्धीचं बांधकाम पुर्णतः सुरक्षित आहे. त्यामध्ये काहीही अडचण नाहीये. कारण आतापर्यंत जेवढ्या घटना घडल्या आहेत, त्यात रोडच्या बांधकामामध्ये काही समस्या असल्याचे समोर आलेले नाहीये. काही ठिकाणी मानवी चुका तर तर काही ठिकाणी वहानांमध्ये बिघाड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रोडच्या बांधकामाबद्दल बोलणं उचित नाही.

आपण उपाययोजना करत आहोत. अपघात होणार नाही यासाठी आपण स्मार्ट सिस्टीम बसवत आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण मॉनिटरींग करणार आहोत. जे लोक जास्त वेगाने चालवत आहेत त्यांना अलर्ट देण्यासाठी ही स्मार्ट सीस्टीम बसवत आहोत. पण ही स्मार्ट सीस्टीम येतनाही पर्यंत चालकांचे प्रबोधन करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले आहेत?

बुलढाण्यातील अपघातानंतर अजित पवारांनी शोक व्यक्त करत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या वतीनं सातत्यानं करण्यात आली आहे. शासनानं आतातरी या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी करतो, असे म्हटले होते.

शरद पवार काय म्हणाले...

अपघातानंतर शरद पवारांनी देखील या महामार्गावरील वेगमर्यादेवर प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी याबद्दल ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.

या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या

Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

Lohegaon Airport चे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, आता विमानतळ संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखले जाणार

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

SCROLL FOR NEXT