Devendra Fadnavis Portfolio News Devendra Fadnavis Portfolio News
महाराष्ट्र बातम्या

Portfolio : भाजपचे राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल; विभागांच्या विभागणीत खेळी

सकाळ डिजिटल टीम

Devendra Fadnavis Portfolio News मुंबई : एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्रिपदेही विभागली गेली आहेत. मंत्रिपदांच्या विभाजनात कोणाची चालली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ज्या पद्धतीने विभागांची विभागणी (Portfolio) करण्यात आली आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे वरचढ ठरल्याचे दिसत आहे. सोबतच शिंदे सरकारमध्ये भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले असले तरी इतर बाबींमध्ये मोकळेपणा दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शिंदे सरकारच्या खात्यांच्या वाटपावर नजर टाकली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मास्टरस्ट्रोक स्पष्टपणे दिसून येतो. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती ठेवली होती.

आता भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हाच फॉर्म्युला वापरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार प्रमुख नेत्यांकडे असलेली चारही खाती कायम ठेवली आहे. अशाप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपने (BJP) बहुतांश महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत.

थेट सामान्य जनतेशी संबंधित असलेले खाते स्वत:कडे ठेवून भाजपने आपला इरादा स्पष्ट केला आहे. हे खाते भाजपकडे असल्याने त्यांचा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांशी संपर्क वाढणार आहे. जनहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी करताना भाजपला पक्षविस्ताराच्या धोरणावरही काम करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT