Sharad Pawar, AJit Pawar and Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांच्या पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया म्हणाले,' त्यावर मी योग्यवेळी...'

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं 'लोक माझे सांगाती' भाग 2 या आत्मचरित्राचे प्रकाशन आज झाले. या पुस्तकात महाविकास आघाडी, शिवसेना, उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंबधी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले 'शरद पवारांचे पुस्तक मी वाचले नाही. त्यामुळे त्यावर कमेंट्स करणार नाही. पण तो जो सर्व एपिसोड आहे त्यावर मी योग्यवेळी पुस्तक लिहिणार आहे. त्यातून नेमकं काय घडलं हे तुमच्या लक्षात येईल' अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

शरद पवारांचे 'लोक माझे सांगाती' हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं आहे. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं. आता, या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे.

या दुसऱ्या भागात २०१५ पासून ते २०२३ पर्यंतच्या अनुभवी आणि महत्वाच्या घटनांची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. यामध्ये, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन केलेल्या शपथविधीवरही पवार यांनी मोठा खुलासा केला आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडाला राष्ट्रवादीचा कसलाही पाठिंबा नव्हता, त्यांनी त्यांच्यासोबत काही आमदार घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही.

कारण त्याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि नवं सरकार स्थापन झालं असा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये केला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT