devendra fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

अधिवेशनात राणेंच्या 'म्याव, म्याव'चे पडसाद; फडणवीसांनी टोचले कान

आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

सकाळ डिजिटल टीम

आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

मुंबई - आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यादरम्यान, विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकमेकांना काही मुद्द्यांवरुन धारेवर धरलं. दरम्यान, भाजपाच्या नितेश राणे यांनी काल आक्षेपार्ह पद्धतीने काढलेल्या 'म्याव म्याव'चे पडसाद आज सभेत उमटले. यावरून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासह सर्वांची कानउघाडणी केली आहे. कोणीही कोणत्याही नेत्याची अशी नक्कल करु नये असे म्हणत त्यांनी खडसावले आहे.

अधिवेशन काळात प्रतिक्रिया देत असताना, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव करणारी शिवसेना असं वादग्रस्त वक्तव्य केलं होत. यावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी नितेश राणे यांच्या निलंबणाची मागणी केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेचा खरपूस समाचार घेतला आहे. कोणत्याच पक्षातील नेत्यांनी कुणाचीही नक्कल करु नये असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, काल याच मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज काही काळ ठप्प झाले होतं. भास्करराव जाधव यांनी अशाप्रकारे पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली असून त्यांनी तात्काळ माफी मागावी यासाठी भाजपा नेते आक्रमक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT