राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा अनेकांनी निषेध नोंदवला आहे. काल राज्यभरातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. दरम्यान आज सकाळपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut), भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रामध्ये असे हल्ले होणे योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांचे मुद्दे योग्य मांडले जावेत याला सरकारने प्रतिसाद द्यावा. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होणार हे माध्यमांना माहीत होतं. अशावेळी पोलिस काय करत होते असा प्रश्न विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले, एवढा मोठ्या नेत्याच्या घरावर हल्ला करण्याचं प्लॅनिंग होतं, हल्ला होतोय आणि पोलिसांना कल्पना नाही. हे खरे तर पोलिसांच मोठं फेल्युअर आहे. याची खरी चौकशी झाली पाहिजे. कॅमेरामन पहिला पोहोचतात आणि पोलिस उशिरा पोहचतात हे कसं शक्य आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस यंत्रणांचे काम वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळवणे हे असतं. या घटनेमध्ये पोलिस कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. पोलिसांच्या आधी माध्यमांना माहिती होते. जर माध्यम अशाप्रकारे शोधून काढू शकतात तर पोलिस यंत्रणा का शोधून काढू शकत नाही असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विचारला. वास्तविक आपल्याच राज्यातील हे लोक आहेत. कर्मचाऱ्यांना भडकावण्याचे काम केलं आहे असेही ते म्हणाले. या मागचा मास्टरमाईंड लवकरच पोलिस यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.