मुंबई : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये (PM Modi Security Lapse) गंभीर चूक झाल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूरमधील सभा रद्द (PM Modi Punjab Rally Cancel) करण्यात आली. याबाबत गृहमंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधानांचा ताफा जवळपास १५-२० मिनिटे उड्डाण पूलावर अडवण्यात आला. त्यावरूनच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संतप्त प्रतिकिया व्यक्त केली आहे.
आपल्या माननीय पंतप्रधानांच्या सुक्षेचे काय झाले? असा संतप्त सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. पंजाबमधील घटना अत्यंत निषेधार्ह आहे. सर्वात वाईट म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री बोलण्यास किंवा कॉलला उत्तर देण्यास नकार देतात, अशी टीकाही त्यांनी पंजाब सरकारवर केली. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील फडणवीसांनी केली.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून पंजाब सरकारव टीका केली आहे. पंजाब सरकार देशाच्या पंतप्रधानांसोबत खेळ खेळतेय हे योग्य नाही, असं पाटील म्हणाले. तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पंजाबमध्ये नेमकं काय घडलं? -
''पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला होता. त्यावेळी काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचं दिसून आलं. या आंदोलकांमुळे पंतप्रधान जवळपास 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही एक मोठी चूक होती. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि त्यांच्या प्रवासाचा आराखडा पंजाब सरकारला अगोदरच कळवण्यात आला होता. प्रोटोकॉलनुसार, त्यांना लॉजिस्टिक, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागते. तसेच ऐनवेळी काही घडल्यास त्यासंदर्भातील योजनाही तयार ठेवावी लागते. मात्र, पंजाब सरकारने यासंदर्भात कसलीही सुरक्षा तैनात केली नव्हती'', असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.