Devendra Fadnavis reply to Bhaskarrao jadhav pver allegation on Vidhan Sabha President Assembly Monsoon session  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : भास्कर जाधवांची अध्यक्षांबरोबर खडाजंगी; फडणवीस म्हणाले, "त्यांना केक खाऊ घाला"

रोहित कणसे

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. यादरम्यान विरोधकांकडून वेगवेगळ्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं जात आहे. यादम्यान अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने आल्याचे पाहयाला मिळालं.

सभागृहात अनेकदा हात वर करूनही प्रश्न विचारण्याची संधी दिली नाही असे म्हणत भास्कर जाधव यांनी विधानसभेत अध्यक्षांवर आक्षेप घेतला. यावर फडणवीसांनी अशा प्रकारे अध्यक्षांवर हेतू आरोप करणे योग्य नाहीये. असं काही असेल तर अध्यक्षांना जाऊन भेटा. एकावेळी शंभर लोकं हात वर असतात, अनेक जण प्रत्येक प्रश्नावर हात वर करतात प्रत्येक वेळी बोलायला मिळेल असं नाही,

ठरवून भास्कर जाधव यांना बोलू देऊ नये अशा प्रकारचा कोणाचा हेतू नाहीये, असा आरोप करणं योग्य नाहीये. ते (भास्करराव जाधव) अनेकदा चिडतात तेव्हा असे शब्द निघतात तुम्ही सिनियर आहेत अशी भूमिका घेऊ नका असेही फडणवीस म्हणाले.

पुढे उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, उपमुख्यमंत्री महोदय आपण माझ्या भावना समजू शकलात, आपल्यात जे वाक्चातुर्य आहे त्याला तोड नाहीये.पण गेल्या वर्षी एका वेळेला आठ-आठ लक्षवेधी लागायच्या. लक्षवेधींचा स्कोप आणि व्याख्या तुम्हाला माहिती आहेत. मी अध्यक्षांकडे जाऊन माझ्या दोन लक्षवेधी लावा विनंती केली. मी अनेकदा त्यांच्याकडे जातो, भेटून चहा पिऊन येतो. काही जरी चुकीचं झालं असेल तरी कानावर घालतो.मी राष्ट्रवादी अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचाराला मीच गेलो होतो .

पण खाजगीत तुम्ही (देवेंद्र फडणवीस) काही सांगून ठेवलं आहे की काय, तुम्ही जर असं काही सांगून ठेवलं असेल तर मला सोबत घेऊन चला आणि हा विषय संपवून टाका असं भास्करराव जाधव म्हणाले.

त्यांना गोड केक खाऊ घाला

यावर फडणीसांनी सभागृहात उभे राहत मिश्कील भाषेत उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला यासगळ्या पाठीमागचं कारण लक्षात आलं आहे. तुम्ही केवळ त्यांना (भास्करराव जाधव) चहा प्यायला देताय, तुम्ही त्यांना केक खायला देत नाहीये. आज त्यांना गोड केक खाऊ घाला आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या. भास्करराव असं काही नाही इथं सर्वांना संधी आहे, कमी अधिक असेल तर अध्यक्ष लक्ष घालतील असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde VIDEO: विनोद तावडेंना बविआ कार्यकर्त्यांनी हाॅटेलमध्ये घेरलं, पैसे वाटल्याचा आरोप करत घातला राडा, काय घडलं नेमकं?

Latest Marathi News Updates : प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद

IND vs AUS: विराट धावांचा भुकेला, ऑस्ट्रेलियात दुपटीने वसुली करेल, माजी भारतीय कर्णधाराचा विश्वास

Dhananjay Munde : जातीपातीचा विचार न करता विजयसिंहांना संधी द्यावी; गेवराई येथे मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन!

Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?

SCROLL FOR NEXT