devendra fadnavis  esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis Update: देवेंद्र फडणवीस जपानहून मुंबईत परतले; म्हणाले, आता भरपूर कंपन्या...

संतोष कानडे

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा आटोपला आहे. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान मुंबई एअरपोर्टवर फडणवीसांचं आगमन झालं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी चांद्रयान, काँग्रेस आणि जपान दौऱ्यातील उपलब्धींबद्दल भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जपानच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर पुन्हा एकदा मातृभूमीचं दर्शन घेताना प्रसन्न वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून जपानसोबत जे उत्कृष्ट संबंध ठेवले, त्याचा फायदा होत आहे. जपानच्या सरकारने राज्य अतिथी म्हणून निमंत्रित केलं होतं. सरकारी विभाग आणि अनेक कंपन्यांसोबत बैठक झाल्या आहेत, त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल.

फडणवीस पुढे म्हणाले की, जपानच्या अनेक कंपन्या शिष्टमंडळासह भारतात चर्चेसाठी येणार आहेत. सोनी आणि इतर कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. जपानच्या कंपन्यांना चीमध्ये गुंतवणूक करावी वाटत नाही, त्यामुळे त्यांना भारत सेफ वाटत आहे. नवीन भारताच्या क्षमतेवर जपानी कंपन्यांचा मोठा विश्वास असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

फडणवीस म्हणाले की, जपानमध्ये माझं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलं गेलं. भारतीय दूतावासामध्ये चांद्रयान-३ चं लँडिंग लाईव्ह पाहिलं. तिथल्या भारतीयांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आपल्या वैज्ञानिकांनी चांगलं काम केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान इस्रोमध्ये गेले तर काँग्रेसला वाईट वाटण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी टीकाकार काँग्रेस नेत्यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT