Devendra Fanavis Shared Photo Esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fanavis Shared Photo: 'मी म्हटलो होतो ना त्या कारसेवकांमध्ये होतो म्हणून!' फडणवीसांचा तो फोटो व्हायरल

Devendra Fadnavis Shared karsevak old Photo: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील छायाचित्र देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. दरम्यान अनेक कारसेवकांनी त्या काळचे फोटो शेअर करत त्यावेळच्या आठवणी सांगितल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक जुना फोटो शेअर करत आठवण सांगितली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणही कारसेवक होतो आणि अयोध्येला कारसेवेसाठी गेलो होतो असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो शेअर करत कारसेवेला गेल्याचा पुरावाच दिला आहे.

राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाट उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते. त्यावेळची ही आठवण आहे. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती. त्या गर्दीचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहे.

नागपुरातून अयोध्येतील कारसेवेला जात असतानाचे रेल्वे स्थानकावरील फोटो देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. नागपुरातील ‘नवभारत’ या वृत्तपत्रात त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर रेल्वेस्थानकावरचे फोटो प्रकाशित झाले होते. हा फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांनी मीसुद्धा कारसेवा करायला गेलो होतो हे पुराव्यासह सांगितलं आहे.

हा फोटो पोस्ट करत असताना त्यांनी लिहलं आहे की, "जुनी आठवण...नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे...नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे."

दरम्यान, त्यावेळी रेल्वे, बस, गाड्या मिळेल त्या वाहनाने कारसेवक राम मंदिराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडवल्या होत्या. त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत निघाले होते. बाबरी मशीद पाडण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात होते.

कारसेवा म्हणजे काय?

मुळात कारसेवा हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही. हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आला आहे. कार हा शब्द कर म्हणजेच हात या अर्थाने आहे आणि सेवा किंवा सेवक हे शब्द त्याला जोडून आले आहेत. निस्वार्थपणे सेवा करणारा म्हणजे कारसेवक, असा त्याचा अर्थ आहे. इंग्रजीत हा शब्द Volunteer असा आहे.

कधी वापरला शब्द?

कारसेवा या शब्दाचा उल्लेख शीख धर्मगुरुंनी अनेक ग्रंथांमध्ये केला आहे. ही शीख धर्माची शिकवण असल्याचंही सांगितलं जातं. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराची उभारणी कारसेवेतूनच झाली होती. राम मंदिर आंदोलनाच्या वेळी देशभरातून कारसेवकांची लाटच उसळली होती. लाखो तरुण त्यावेळी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी त्या दिशेने निघाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT