devendra fadnavis slam sanjay Raut over chormandal statement uddhav thackeray politics  Devendra Fadnavis and Sanjay Raut
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis Video : '...मग उद्धव ठाकरेंनाही चोर ठरवणार आहेत का?'; फडणवीसांनी घेतला राऊतांचा समाचार

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला. सत्ताधारी पक्षाकडून खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले . राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्याचा मुद्दा चांगलाच तापला. राऊतांवर हक्कभंगाची मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊतांवर जोरदार हल्ला चढवला.

मला असा वाटतं की चोरमंडळात काम करण्यापेक्षा घरी गेलेलं बरं.. कशाकरिता चोरमंडळात काम करता. सत्तापक्ष-विरोधीपक्ष आरोप-प्रत्यारोप हा वेगळा विषय आहे.हा सत्तापक्षावर आरोप नाहीये विधान मंडळावर आरोप आहे. हे सहन करण्यासारखं नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जर चोर या विधीमंडळाबाबत बोललं जात असेल तर विधीमंडळाला अर्थ राहणार नाही. मग कुणीही उठेल आणि काहीही बोलेल. म्हणूनच हक्कभंगाची तरतूद आहे. कुणी गाय मारली म्हणून वासरू मारू नये, असेही फडणवीस म्हणाले.

संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल. उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का? असा सवाल देखील फडणवीसांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

महाराष्ट्र विधानमंडळाची अतिशय थोर परंपरा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. हा विरोधी वा सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाही. हे सहन केले तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. सर्वोच्च सभागृहाचा हा घोर अपमान आहे.असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हा स्पष्ट संकेत देणे गरजेचे आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT