Beed: राज्याच्या राजकारणात कायम चर्चिली जाणारी बहीण-भावाची जोडी म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करुन धनंजय मुंडे आमदार झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या खात्यात ते मंत्रीदेखील राहिलेले आहेत.
दुसरीकडे पक्षातच पंकजा मुंडेंचं खच्चीकरण झाल्याचं पहावयास मिळालं. आता मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक एकत्र आल्याचं पहावयास मिळत आहे.
मुंडे कुटुंबाचं मूळ गाव बीडच्या परळी तालुक्यातील नाथ्रा आहे. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. यावेळी मात्र अभय मुंडे यांच्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याचं पहावयास मिळालं. चुलतभाऊ अभय मुंडे हे सरपंचपदासाठी उभे आहेत. दोन्ही समर्थकांनी एकत्र येत गावच्या भल्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
हेही वाचाः Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या मुंडे बहीण-भावाने एकत्र यावं, यावर कायम चर्चा होत असतात. धनंजय मुंडे यांनी यापूर्वी अनेकदा साद घातली. मात्र पंकजा मुंडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. निदान नाथ्रा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तरी बहीण-भाऊ एकत्र पोस्टर्सवर झळकले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.