Onion Market News : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा काढला जावा यासाठी आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच या खरेदीसाठी नाशिक आणि नगर मध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबद्दल माहिती दिली. मुंडे म्हणाले की, महाराष्ट्रातील कांद्याचे दर निर्यात शुल्क वाढवल्याने खाली येत आहेत. त्यामुळे पियुष गोयल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला तात्काळ नाफेडच्या मदतीने कांदा खरेदी सुरू करावी अशी विनंती केली.
मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वी ११ ते १५ रुपयांनी कांद्याची खरेदी झाली. आज ऐतिहासीक भावाने नाफेडकडून केंद्र सरकारने आत्तापर्यंत ३ लाख टन कांदा खरेदी केला आहे. इथून पुढे २ लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो २४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे.
मी वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की दोन लाख टन पेक्षा जास्त कांदा आला तर तो देखील याच भावाने खरेदी करावा या मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
पियुष गोयल काय म्हणाले
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पियुष गोयल यांनी देखील कांदा खरेदीबद्दल माहिती दिली. गोयल म्हणाले की, पुढे देखील आणखी कांदा खरेदी करावा लागला तर खरेदी करू. मध्यप्रदेश, गुजरात येथे कांदा होतो तेथे देखील एनसीसीपएफ आणि नाफेड कांदा खरेदी करेल. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल.
या कांदा खरेदीचा दर आज निश्चित झालेला भाव २४१० रुपये प्रतिक्विंटल आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकार यावर नियंत्रण ठेवून आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार पुर्णतः तत्पर आहे असे पियुष गोयल म्हणाले.
फडणवीसांची जपानमधून सरशी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. तर दिल्लीत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि पियुष गोयल यांची बैठकी झाली. या बैठकीत काही निर्णय होण्याआधीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कांदा उत्पादकांसाठी घेण्यात आलेल्या दिलासादायक निर्णय ट्वीटरवरून जाहीर करून टाकला .
फडणवीसांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा ट्वीटरवरून केली
२४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या आधीच जपानमधून फडणवीस यांनी पुढाकार घेत निर्णय जाहीर केल्याने त्यांनी जपानमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर सरशी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.