Dhananjay Munde says despite being agriculture minister there are many problems in Ajit Pawar Beed Sabha  
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde News : "मी कृषिमंत्री असलो तरी अनेक अडचणी"; धनंजय मुंडे मंत्रिपदावर नाराज?

रोहित कणसे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल (२७ ऑगस्ट) धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांची जोरदार फटके बाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं देखील भाषण प्रभावी ठरलं.

दरम्यान या भाषणावेळी धनंजय मुंडे यांनी केलंल्या वक्तव्यमुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत असे धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात बोलले. यामुळे धनंजय मुंडे धनंजय मुंडे मंत्रिपदावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

"आजची सभा ही १७ तारखेला बीडमध्ये. झालेल्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. बीड जिल्ह्याने आदरणीय शरद साहेबांवर फार प्रेम केलं, मात्र त्याबद्दल साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे. पण साहेबांचे उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला अजितदादांनी दिले आहे"असे धनंजय मुंडे म्हणाले.

अजितदादांशिवाय प्रश्न सुटू शकत नाहीत...

यावेळी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक देखील केलं, धनंजय मुंडे म्हणाले की, "आजची सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि जिल्ह्यातील संपूर्ण दुष्काळ मिटवणारी सभा आहे. त्यासाठी आपला आवाज दिल्लीत गेला पाहिजे. या जिल्ह्याच्या अनेक अपेक्षा मा. अजितदादांनी पूर्ण केल्या, म्हणूनच त्यांना एकच वादा, अजितदादा म्हटल जातं. अजितदादांशिवाय बीड जिल्ह्यातील असंख्य प्रश्न सुटू शकत नाहीत"

सवाल तो इस बात का है की...

पुढे ते म्हणाले की, "बीड जिल्ह्यातील मान्यवरांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आम्ही बीडकरांची सेवा करत राहणार आणि आमचे उत्तरदायित्व पार पाडणार. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. माझा इतिहास सर्वांना माहिती आहे तरीही १७ तारखेच्या पूर्वसंध्येला माझा इतिहास विचारला गेला आणि धनंजय मुंडेंनी तो इतिहास जनतेला सांगावा असे सांगितले. माझ्या राजकीय इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अजितदादांनी मदत केली असेल तर अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का? स्व. मुंडे साहेबांच्या हाताला धरून संघर्ष केला. पुढे प्रश्नांसाठी संघर्ष करायचा, प्रश्न सोडवायचे हा माझा इतिहास आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला हे 'लोक माझ्या सांगाती' पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये माझ्या दैवताने लिहीले आहे. त्यामध्ये विधानसभेपेक्षा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची कर्तबगारी जास्त होती असे सांगण्यात आले. हा माझा इतिहास आहे. आज सवाल इस बात का नहीं शिशा तुटा है, सवाल तो इस बात का है की पत्थर कहा से आया।"

अभिमान वाटेल अशी जबाबदारी मी पार पाडेन...

"माझ्या पाचवीला संघर्ष पुजला आहे. मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत. तुम्ही आज शेतमजुराच्या पोराला कृषी विभागाची जबाबदारी दिली त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी मी पार पाडेन, आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर आम्हाला संस्कार दिसत नाहीत. कोणीही उठावे आणि काहीही बोलावे हे साहेबांचे संस्कार नाहीत" असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT