Dhananjay Munde with Karuna Sharma Sakal
महाराष्ट्र बातम्या

धनंजय मुंडेंचे अन्य महिलांशीही अनैतिक संबंध; करुणा शर्मांचे गंभीर आरोप

मी जर सीडी लावली तर महाराष्ट्र हादरेल, असंही करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी यापूर्वीही अनेक गंभीर आरोप केले आहेत. पुन्हा एकदा या आरोपांची पुनरावृत्ती करत करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात बंड पुकारलं आहे. धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा शर्मा पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच आपण जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल, असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं आहे. (Karuna Sharma serious allegations on Dhananjay Munde)

आपली मुलगी शिवानी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पत्रकार परिषद घेणार होती, मात्र ती अनुपस्थित राहिल्याने आपण पत्रकार परिषद घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवानी मुंडेंच्या विरोधात मोठा गौप्यस्फोट कऱणार होती, पण मुलीला धमकावल्याने ती पत्रकार परिषदेला गैरहजर राहिल्याचा आरोपही करुणा शर्मांनी केला आहे. मुंडेंच्या सांगण्यावरुन मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांनी माझ्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज केले, त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासाही करुणा शर्मांनी केला आहे.

धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई झाली, त्यांच्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली, असे खुलासेही करुणा शर्मांनी केले आहेत. त्याचबरोबर मीच मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा शर्मांनी केला आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) म्हणाल्या,"मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही मी आज पर्यंत त्यांची इज्जत करत होते. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझ्या आईंची मुंडेंनी हत्या केली आहे. मुंडेंनी मंत्री पदाचा गैरवापर केला. पवारांनी मुंडेंना मंत्री पदावरून हकललं पाहिजे. माझ्यापासून दोन मुलांना जन्म देऊन त्यांनी आम्हाला रस्त्यावर सोडलं.धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे माझाकडे आहेत.

आपण या प्रकरणी सुप्रिया सुळेंकडेही (NCP MP Supriya Sule) अनेकदा न्यायासाठी विनंती केली, पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरून हकलण्याची मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेले आरोप लवकरच माझी बहिण त्याचे पुरावे देईल, असंही करुणा शर्मा यांनी सांगितलं.

करुणा शर्मा पुढे म्हणाल्या, "धनंजय मुंडे दहा नंबरहून का बोलतात एका वेश्याचेही दहा नंबर नसतात मग मुंडे नेमके बोलतात कुणाशी ? मी खंडणी मागते असे धनंजय मुंडे आरोप करतात मी ५ कोटीच्या घरात राहते त्या अडीच कोटीचे कर्ज माझ्यावर आहे. तसंच माझा सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेतलं आहे .मी माझा खात्यावरून धनंजय मुंडेंना १ कोटी रुपये दिले आहेत. वेळोवेळी मी मुंडेंच्या सांगण्यावरून त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पैसे दिले आहेत. मी सध्या सोनं विकून घर चालवत आहे. मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT