Dhangar Reservation: महाराष्ट्रात जातीय आरक्षणासाठी मराठ्यांच्या आंदोलनाचा परिणाम इतर सामाजिक गटांवरही झाला आहे. आता धनगर समाजही मैदानावर उतरला आहे. आरक्षणाचा कोटा वाढवून अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्याची धनगर समाजाची मागणी आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्या बद्दल होत आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर म्हणाले, "आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होइल , ही आशा सामान्य धनगरांना आहे . मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे."
समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना समान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे. आपण वेळेत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा. अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला व आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम ५ कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.