Eknath Shinde Uddhav Thackeray Dharmaveer movie Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde:'धर्मवीर'मुळे ठाकरे-शिंदेंचं बिनसलं? राज ठाकरे कनेक्शन समोर

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर धर्मवीर हा चित्रपट आधारित होता.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा विषय आता पेट घेताना दिसत आहे. यामध्ये आता नव्याने ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आलेल्या धर्मवीर या चित्रपटामुळे ठाकरे शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा रंगत आहेत. (War between Eknath Shinde and Uddhav Thackeray over a movie on Anand Dighe)

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Shivsena leader late Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर (Dharmaveer marathi movie) हा चित्रपट आला होता. या चित्रपटात एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचेही काही सिन होते. यामध्ये चित्रपटाच्या शेवटी असलेल्या एका सीनमुळे ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा सध्या होत आहेत.

कोणता आहे हा सीन?

या चित्रपटाच्या एका प्रसंगात आनंद दिघे रुग्णशय्येवर आहेत. त्यांना भेटायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS leader Raj Thackeray) गेले आहेत. यावेळी दिघे राज ठाकरेंचा हात हातात घेऊन म्हणतात की, हिंदुत्व आता तुमच्या हातात सुरक्षित आहे. हा चित्रपट पाहतानाही हा सीन उद्धव ठाकरेंना आवडला नव्हता. त्यामुळे चित्रपटाचा क्लायमॅक्स व्हायच्या आधीच उद्धव ठाकरे उठून निघून गेले होते.

यानंतर या चित्रपटातला हा प्रसंग वगळण्याची मागणी करण्यात येत होती. एकनाथ शिंदेंनाही याबद्दलची माहिती देण्यात आली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्ये धूसफुस असल्याच्या चर्चा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT