Ranjitsinh Disale Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

डिसले गुरुजींना कारवाईऐवजी दिली समज? शिक्षण आयुक्त अन्‌ झेडपी सीईओंची घेतली भेट

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली. पण, विशेष बाब म्हणजे आयुक्तांकडे डिसलेंच्या चौकशीचा कोणताही अहवाल नसताना त्यांनी बाजू ऐकून घ्यायला बोलावले होते. त्यानंतर डिसलेंनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचीही भेट घेतली. त्यामुळे कारवाईऐवजी ग्लोबल टिचर डिसलेंना समज दिल्याचे बोलले जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : डिसले गुरुजींनी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते घरी कमी आणि मुंबई-पुण्यातच जास्त होते. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी डिसलेंना बोलावून त्यांची बाजू ऐकून घेतली. विशेष म्हणजे आयुक्तांकडे डिसलेंच्या चौकशीचा कोणताही अहवाल नसताना त्यांनी बाजू ऐकून घ्यायला बोलावले होते. त्यानंतर डिसलेंनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचीही भेट घेतली. त्यामुळे कारवाईऐवजी ग्लोबल टिचर डिसलेंना समज दिल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना ‘क्युआर कोड’ शिक्षणप्रणाली देणारे परितेवाडी (ता. माढा) शाळेवरील शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी राज्यभर झळकले. त्यांच्याकडील कौशल्य, ज्ञान व माहिती, नवतंत्रज्ञान इतरांनाही समजावे म्हणून जिल्हा परिषदेने त्यांची प्रतिनियुक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर केली. पण, २०१७ ते २०२० या काळात त्यांनी त्याठिकाणी केवळ एकच दिवस हजेरी लावली. दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालात ते उघड झाले. तेवढे दिवस डिसले गुरुजी शाळेतही गेले नाहीत, पण दरमहा पगार घेत होते. त्यांच्याबद्दल जिल्हा परिषदेकडे तक्रारी आल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी समिती नेमली. त्यात या गंभीर बाबी पुढे आल्या. पण, ग्लोबल झाल्यानंतर शिक्षण व राजकीय क्षेत्रात राज्यभर, देशभर पोहचलेल्या डिसलेंवर सहजपणे कारवाई करणे प्रशासनाला कठीणच होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दुसरी समिती नेमली आणि पहिल्या चौकशी अहवालातील डिसलेंवरील प्रत्येक आरोपाची खातरजमा केली. तत्पूर्वी, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी परदेशात जाण्यासाठी रजेचा अर्ज दिला, पण महिना होऊनही रजा मिळाली नाही असे डिसलेंनी माध्यमांसमोर सांगून अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्या एक महिन्याचा हिशोबच दिला आणि अर्धवट कागदपत्रे असल्याचेही सांगितले. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाने त्यांच्या रजेचा अर्ज मंजूर झाला होता. पण, चौकशी समित्यांच्या अहवालानुसार आपल्यावर कारवाई होणार, याची जाणीव डिसलेंना होतीच. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांना अपेक्षित होते तसेच झाले. थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटले आणि कारवाईला ब्रेक मिळाला, अशी चर्चा सुरु आहे.

डिसले मागे घेणार राजीनामा

चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर ग्लोबल टिचर डिसले गुरुजींना ७ जुलैला राजीनामा दिला. अधिकाऱ्यांकडून जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले गेले. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून डिसले गुरुजींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि गुरुजी टेन्शन फ्री झाले. त्यांच्या आदेशानुसारच शिक्षण आयुक्तांनी डिसलेंना बाजू मांडण्यासाठी बोलावले होते, अशी चर्चा आहे. त्यानंतर डिसले मंगळवारी (ता. १९) झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांना भेटले. सीईओ स्वामी यांनीच डिसलेंना भेटीसाठी बोलावले होते, हेही विशेषच. एकूणच डिसले गुरुजी आता मुदतीत राजीनामा मागे घेतील, यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT