Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray And Smita Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यात मतभेद का झाले?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई आणि जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे एककाळी शिवसेनेतील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून समोर आल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांच्याकडे जातं की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव यांना नियुक्त केले. त्यानंतर मात्र एकेकाळच्या शिवसेनेतील सर्वशक्तीमान महिला नेत्या राजकारणात फारशा सक्रिय दिसल्या नाही. उद्धव यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्या शिवसेनेपासून दुरावल्याच सांगण्यात येतं असलं यात तथ्य असल्याचं स्पष्ट झालं नाही.

शिवसेनेचं सत्ताकेंद्र असलेल्या स्मिता ठाकरे यांचा शब्द १९९५ ते १९९९ या काळात अंतिम मानला जात होता. फेब्रुवारी 1999 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री झाले. स्मिता ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले होते, असं राजकीय विश्लेषक सांगतात. एवढंच नाही तर अनेक उद्योगपती किंवा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी स्मिता ठाकरे यांच्याशी संपर्क करायचे. एवढंच नाही तर, शिवसेनेच्या सत्ता काळात कोणत्याही विभागाची फाईल स्मिता ठाकरे मागवून घ्यायच्या, एवढा त्यांचा प्रशासनात दबदबा होता, असंही सांगण्यात येत. मात्र शिवसेनेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे नाकारलं होतं.

स्मिता ठाकरे यांच्याकडे त्याकाळी शिवसेनेचा उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जावू लागलं. त्याचा राजकारणातील वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. तसेच राजकीय महत्त्वाकांक्षा देखील अधोरेखित होऊ लागली. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेतील निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढला. कालांतरने अनेक निर्णय उद्धव ठाकरे घेऊ लागले. २००३ मध्ये उद्धव ठाकरे अधिकृतरित्या पक्षप्रमुख झाले. त्यानंतर शिवसेनेचं नेतृत्व पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातात स्थिरावलं.

दरम्यान २००८-०९ मध्ये स्मिता ठाकरे यांना राज्यसभेवर जायचं होतं. त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांची ती इच्छा पूर्ण करता आली नाही. बाळासाहेबांना आश्वासन पूर्ण करता न आल्याने आपण काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्मिता यांनी त्यावेळी म्हटलं होतं. त्यावेळी उद्धव यांनी स्मिता यांच्याऐवजी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांना राज्यसभेवर पाठवलं होते.

एकेकाळी शिवसेनेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्याकडे उत्तराधिकारी म्हणून पाहिल जावू लागलं. मात्र त्याच कालावधीत स्मिता यांचा घटस्फोट झाला. त्यामुळे घटस्फोट झाल्याने सहाजिकच स्मिता यांना ठाकरे नाव लावता येणार नव्हतं, अशी स्थिती होती. ही बाब उद्धव ठाकरे यांच्यासाठी कायदेशीरित्या जमेची ठरणार होती. तसेच स्मिता आपलं वजन राज ठाकरे यांच्या पाठिंशी उभं करू शकत नव्हत्या.

दरम्यान अखेरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावरच अवलंबित्व अधिक वाढत गेलं. त्यामुळे स्मिता यांचा प्रभाव कमी होत गेला. तर दुसरीकडे उद्धव यांनी स्मिता यांना एक संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कमी होऊ दिला नाही. तर दुसरीकडे घटस्फोट झाल्यानंतर जयदेव ठाकरे यांनी स्मिता यांना संधीसाधू म्हटलं होतं. जयदेव यांनी अशा प्रकरे टिप्पणी केल्याने उद्धव यांना एकप्रकारे मदतच झाली होती.

एकंदरीतच उद्धव यांच्या हातात शिवसेना आल्यानंतर स्मिता ठाकरे सातत्याने दुर्लक्षीत होत गेल्या. तर उद्धव यांनी त्यांना सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं, असं अनेकांना वाटतं. मात्र आज स्मिता यांनी आपुलकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे उद्धव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यातील मतभेद पुढील काळात आणखी तीव्र होणार का हे येणारा काळच सांगेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT