Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: मोदीबागेत जुने सहकारी आले भेटीला! वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीच कारण आलं समोर

दिलीप वळसे पाटील शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदीबागेत शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते दिलीप वळसे पाटील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदीबाग येथे दाखल झाले आहेत. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात आहेत. सध्या ते सरकारमध्ये सहकारमंत्री आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणुन दिलीप वळसे पाटील यांची राजकारणात ओळख आहे. दिवाळी निमीत्त शुभेच्छा देण्यासाठी ते पोहोचले आहेत.

दिवाळी सणाच्या निमीत्ताने संपुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतो. पण, पक्षात फुट पडल्यानंतर सर्वजण एकत्रित येणार का असा सवाल निर्माण झाला होता. अशातच आज दिलीप वळसे पाटील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेत.

दिवाळी सणाच्या निमीत्ताने हेवे दावे, राजकीय मतभेद बाजुला ठेवले जातात. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती आहेत, त्या त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. शरद पवार यांच्या बाजुला असणाऱ्या अनेकांनी दिलीप वळसे पाटील यांना धक्का दिला आहे. ही देखील एक पार्श्वभूमी आहे. तर वळसे पाटील यांच्या कारकिर्दीची सुरूवात देखील शरद पवार यांचे पी,ए म्हणुन झाली होती. शरद पवार यांनी वळसे पाटलांना आमदारकीच तिकीट दिलं होतं.

त्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये ते २० ते २२ वर्षे आहेत. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र, त्यानंतर आता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे, दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ते पुन्हा आले! US Presidential Election मध्ये शानदार विजय, पहिल्याच भाषणात Donald Trump काय म्हणाले?

Vicky Kaushal : विकी कौशलने घेतला पुष्पा 2चा धसका ; छावाची रिलीज डेट बदलणार ?

Latest Marathi News Updates live : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल आता पुढच्या वर्षात येण्याची शक्यता

Share Market Closing: सेन्सेक्स 900 अंकांनी वाढला; निफ्टी 24,500 च्या जवळ, ट्रम्प यांच्या विजयामुळे आयटी शेअर्स तेजीत

भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा तिकीट का देता? नाना पाटेकरांचा थेट सवाल; फडणवीसांच्या उत्तराने उंचावतील भुवया

SCROLL FOR NEXT