राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुन्हा एकदा सभागृहात पेन ड्राईव्ह सादर करत, महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आणि नवाब मलिकांवर (Nawab Malik) गंभीर आरोप केले. यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, मुदस्सीर लांबे यांची वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती मिळाली आहे असं फडणवीसांनी सांगितलं आहे.
डॉ. लांबे यांची नियुक्ती सरकारने केलेली नाही, याबाबतची निवडणूक 30/08/2019 ला झाली असून, ते निवडून आलेले सदस्य असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे विनाकारण दाऊद-दाऊद करू नका. आपण ते जर संबंधित असतील तर त्यांच्यावर कारवाई करू असं वळसे पाटील यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एका पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला आहे. फडणवीसांनी आज पुन्हा एकदा आज एक पुरावा सादर करत, महाविकास आघाडी आणि वक्फ बोर्डावर गंभीर आरोप केले आहे. या पेन ड्राईव्हमध्ये आता दोन पात्र आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदसैर लांबे, ह्यांना नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर (Waqf Board) नियुक्त केलं असून, तो दाऊदचा माणूस असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.