Dilip Walse-Patil टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

कॅबिनेटमध्ये दिलीप वळसे-पाटलांविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी!

मंत्रिमंडळाच्या बैठकित काॅंग्रेसचे नाराजी नाट्य

सकाळ डिजिटल टीम

जाहिर कार्यक्रमात हातात तलवार घेऊन उंचावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावरून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकित काॅंग्रेसचे नाराजी नाट्य पाहायला मिळाले. मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, मुख्यमंत्री सक्षम आहेत. ते योग्य कारवाईवर ठाम असतात. आमचे सरकार आम्ही कशाला नाराज होऊ असेही ते म्हणाले.

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या तक्रारीवरुन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंबोज यांनी ट्विट करत मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना कारवाई करण्याची विनंती केली.

यावरून आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकित गदारोळ झाला. सरकार आपले असूनही आपल्याच मंत्र्यांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल कसे केले जात आहेत, असा सवाल यावेळी मंत्र्यांनी केला. या नाराजीनंतर आता या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमली जाणार आहे. कोणत्या कारणांमुळे गुन्हे दाखल झाले, याचा अहवाल ही समिती सादर करेल, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे समजते. काँग्रेससह शिवसेना (Shiv Sena) व राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांनी वळसे पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. एका कार्यक्रमात तलवार पकडल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता यावरून गुन्हा नोंद झाला आहे.

मोहित कंबोज यांचे नेमके म्हणणे काय आहे

काही दिवसांपूर्वी अस्लम शेख आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे एका कार्यक्रमात एकत्र असताना त्यांनी तलवार काढली होती. यावेळी त्यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्ते देखील होते. तसंच यावेळी पोलीस देखील उपस्थित होते, तरीही त्यांच्याविरोधात लवकर गुन्हा दाखल होत नव्हता असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT