भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज आपण अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं होतं. हातामध्ये प्रतिकात्मक स्वरुपाचा मोठा हातोडा घेऊन सोमय्या रिसॉर्ट पाडण्यासाठी निघाले त्यांच्यासोबत अनेक भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत आहेत. दरम्यान या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीकडून तयारी करण्यात आली, सोमय्या यांनी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत त्यामुळे आता दापोली किंवा रस्त्यात अनेक ठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "लहान-लहान गोष्टीवरुन मोठे-मोठे मोर्चे काढून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा यामुळं सरकारची प्रतिमा बिघडणार नाही. आम्ही पारदर्शी पध्दतीने काम करत आहोत आणि भविष्यकाळात देखील करत राहाणार आहोत." ते पुढं म्हणाले की, "मला त्याकडे जास्त लक्ष देण्याचं कारण नाही. ते कुठं गेले त्याचा ट्रॅक नाही ठेवत. स्थानिक पोलिस कायद्याप्रमाणे त्या-त्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडणार असेल तर नियमाप्रमाणे आवश्यक कारवाई करतील" असे त्यांनी सांगितले. दापोलीतील रिसॉर्टच्या दिशेने निघालेल्या भाजप नेते सोमय्या यांचा ताफा कशेडी घाटात अडवण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी जमावबंदीचे कारण देत किरीट सोमय्या यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.
या पुढे प्रविण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनबद्दल बोलताना गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सीआडी चौकशी करेल, असे सांगितलं. तर फोन टॅपिंग विषय बोलतांना वळसे पाटील म्हणाले की, "त्यात चौकशी कोणा-कोणाची झाली आणि तपास कुठपर्यंत आलाय हा तपासाचा भाग आहे, त्याचा तपशिल उघड करता येणार नाही."
तर पुण्यात मागील काही दिवसांत आत्याचाराच्या घटना समोर येत आहेत त्याविषयी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, "दुर्दैवानं आत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत त्यामध्ये बऱ्याचशा घटना जवळच्या नातेवाईकांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून घडल्या आहेत हा चिंतेचा विषय आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी आणि या घटना पोलिसांना अलर्ट राहायला सांगितलं आहे."
रत्नागिरितील खेड येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दखवत निषेध करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, सोमय्या यांचा डाव हाणून पाडणार असल्याचा निर्धार शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.