Aditya Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरणात होणार एसआयटी चौकशी

रोहित कणसे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. साम टीव्हीला याबद्दलचे वृत्त दिले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला रोजी मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार दिशाने आत्महत्या केली होती. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता.दिशाच्या मृत्युनंतर जवळपास ६ दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता.

या प्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी देखील केली जात होती.

३ नोव्हेंबर २०२२ रोजी सीबीआयचा एक रिपोर्ट आला ज्यामध्ये झालेले राजकीय आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच दिशाचा मृत्यू नशेच्याधुंदित १४व्या मजल्यावरुन पडून झाला होता.

दरम्यान दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्या वेळी होते कुठे ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी राज्य सरकार आता आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक काम करणार आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची सूत्रांची माहीती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates: राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर, नाशिक अन् पुणे दौऱ्यावर

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT