Aaditya Thackeray Disha Salian Sakal
महाराष्ट्र बातम्या

Disha Salian Death : आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काय संबंध?

सीबीआयने आज दिलेल्या अहवालानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

टॅलेंट मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूनंतर त्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. तिचा मृत्यू गेली जवळपास दोन वर्षे संशयाच्या भोवऱ्यात होता. मात्र हा मृत्यू केवळ अपघात असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचंही नाव घेतलं जात आहे. त्यांचा या सगळ्याची काय संबंध? जाणून घ्या...

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाचच दिवसांआधी दिशा सालियानचा दारुच्या नशेत तोल गेल्याने १४ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. दिशावर अत्याचार झाले आणि त्यानंतर तिचा खून झाला, असा आरोपही करण्यात आला होता. मात्र सीबीआयने आज दिलेल्या अहवालानंतर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

हेही वाचा - Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काय संबंध?

दिशा सालियान प्रकरणाचा झटका राज्याच्या राजकारणालाही लागला. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात काही गंभीर आरोप केले. दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. नारायण राणे म्हणाले होते,"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्या प्रकरणातल्या आरोपींना अटक का झाली नाही. त्यात कोणा मंत्र्याचा सहभाग होता का? सचिन वाझेला पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं का?"

आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन टीका करताना राणे म्हणाले होते, "आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात सहभागी होते, अशी चर्चा लोक करतात. सचिन वाझेने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पापं करायला मुख्यमंत्री झाला होता का? दिशा सालियान, सुशांतसिंह राजपूत सोबत केलेलं पाप विसरता येणार नाही,"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT