schools sakal
महाराष्ट्र बातम्या

शाळा- विद्यार्थ्यांना उद्यापासून दिवाळी सुट्या! परीक्षा आज संपणार; यंदा 15 दिवस दिवाळी सुट्टी; ११ नोव्हेंबरपासून सुरु होणार शाळा

विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा शनिवारी संपणार असून त्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांना रविवारपासून दिवाळीच्या सुट्या लागणार आहेत. यंदा शाळांना दिवाळीच्या १५ दिवस सुट्या आहेत. ११ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होतील व दुसऱ्या सत्राचे अध्यापन सुरु होईल.

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा आज (शनिवारी) संपणार असून त्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांना रविवारपासून दिवाळीच्या सुट्या लागणार आहेत. यंदा शाळांना दिवाळीच्या १५ दिवस सुट्या असणार आहेत. ११ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होतील व दुसऱ्या सत्राचे अध्यापन सुरु होईल.

शाळांना दिवाळी सुट्टी कधी लागेल अन्‌ मामाच्या गावाला कधी जातोय, याची ओढ चिमुकल्यांना लागली आहे. काही शाळांची परीक्षा शुक्रवारी (ता. २५) संपली असून बहुतेक शाळांच्या परीक्षा आज (ता. २६) संपणार आहेत. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची दिवाळी सुट्टी सुरु होईल. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून त्यासाठी शिक्षकांसह एकूण १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आहे. त्यांचे रविवारी तालुकानिहाय पहिले प्रशिक्षण पार पडणार आहे.

इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक २४ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून त्यांचे प्रात्यक्षिक- तोंडी परीक्षा ३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, यंदा दिवाळी सुट्यांमध्ये शिक्षकांचे निवडणुकीचे प्रशिक्षण असून त्यानंतर निवडणुकीची ड्यूटी देखील त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे दहावी- बारावीतील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेची तयारी दिवाळी सुट्यातच करावी लागणार आहे.

प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची खुशखबर

यंदा दिवाळी गर्दीच्या हंगामात एसटीची भाडेवाढ होणार नसल्याने एसटीचा प्रवास पूर्वीच्याच दराप्रमाणे करता येणार आहे. तसेच ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत व ज्येष्ठांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. सोलापूर विभागाने दिवाळी हंगामात विविध मार्गांवर बस सुरू केल्या आहेत. स्वारगेट- पुणे येथील दिवाळीपूर्वी प्रवासासाठी आजपासून (शुक्रवारी) पुणे येथून ५० बस,शनिवारी पुणे येथून ४० बस, रविवारी व सोमवारी पुणे येथून प्रत्येकी ४० बसगाड्या, मंगळवारी ७५ बस, ३० ऑक्टोबरला ८० बस आणि ३१ ऑक्टोबरला १२ बस, अशा एकूण ३३७ बसगाड्या दिवाळीपूर्वी स्वारगेट येथून सोलापूर व जिल्ह्यातील सर्व आगांरामध्ये येतील. याशिवाय सोलापूर- लातूर, पंढरपूर- परळी, अकलूज- लातूर, सांगोला- अहिल्यानगर तसेच प्रत्येक आगारातून नियमित लांब व मध्यम लांब फेऱ्यासोबतच जादा पुणे- स्वारगेटसाठीही बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT