children health Sakal
महाराष्ट्र बातम्या

पालकांसाठी दशसूत्री! उन्हाळा सुटीत मोबाईल नको, 'मैदानी'ला द्या प्राधान्य; १२ जूननंतर शाळा सुरु होणार

पालकांना दीड महिन्याच्या उन्हाळा सुटीत मुलांना संस्कारक्षम व स्वावलंबी बनविण्याची मोठी संधी आहे. त्यांची मोबाईलची सवय जावी, त्यांची अभ्यासाची गोडी टिकून राहावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुले घरी असली की दिवसभर पालक कामात गुंतून राहतात. शाळा असताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागते. पण, उन्हाळ्यात बाहेर दिवसभर मुले खेळणार, काहीतरी थंड खाणार आणि आजारी पडणार, हा चिंतेचा विषय असतो. पण, पालकांना दीड महिन्याच्या उन्हाळा सुटीत मुलांना संस्कारक्षम व स्वावलंबी बनविण्याची मोठी संधी आहे. त्यांची मोबाईलची सवय जावी, त्यांची अभ्यासाची गोडी टिकून राहावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुटीच्या दिवसात मुलांना दररोज वृत्तपत्र वाचनाची सवय लावल्यास वाचन, लेखन, अभ्यासू वृत्ती वाढीस लागेल. त्यातूनच मुले शिकतात. तसेच त्यांना दैनंदिन व्यवहार, परिसर, कुटुंब यातूनही उत्तम शिक्षण मिळते. घरात त्यांना कोंडून ठेवू नका, बाहेर मैदानी खेळ खेळू द्या. १२ जूननंतर शाळा सुरु होणार आहेत. तत्पूर्वी, मोबाईलचा वापर जास्त नकोच. मोबाईलमुळे डोळ्याचे विकार, लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे पालकांनी मुलांना वेळ द्यावा, त्यांच्यासोबत खेळावे. कला व सुप्तगुणांना वाव द्यावा. पालकांनीही स्वतः: मोबाईलपासून दूर राहावे. जेणेकरून आपल्यासोबत पालक असल्याची जाणीव त्यांना होईल आणि अभ्यासाची गोडी वाढीस लागेल.

‘ही’ दशसूत्री घडवेल मुलांमध्ये बदल

  • १) रोज सकाळी स्वतः लवकर उठा आणि सोबत मुलांनाही उठवा व काहीवेळ फिरायला जा.

  • २) रात्रीचे जेवण एकत्र करा. दिवसभर घडलेल्या व केलेल्या कामांची चर्चा करून त्यांनाही बोलते करा.

  • ३) रोज रोजनिशी लिहावी व मुलांनाही लिहायला सांगावे. त्यातून लेखनाची सवय होईल व त्यातून शब्द संपत्ती, वाक्यांची रचना करण्याची सवय लागेल.

  • ४) स्वतःचे ताट त्यांनाच धुवायला सांगा. वेळोवेळी अन्नाचे महत्त्व पटवून द्या. घराघरातील छोटी कामे (कपडे घडी करणे, झाडू मारणे, झाडांना पाणी देणे) त्यांना सांगावीत.

  • ५) मातांनी स्वयंपाक करताना मुलांना मदतीला घ्यावे. भाजी निवडणे, लसूण सोलणे अशी कामे सांगून त्यावेळी शाळेतील त्यांचे मित्र-मैत्रिणी, अभ्यास यावर बोलते करा.

  • ६) संध्याकाळी सहज सोपे (भेळ, पाणीपुरी, सरबत, चहा) खाऊचे पदार्थ त्यांना बनवायला सांगा. त्यांचे कामाचे सगळ्यांसमोर कौतुक करा व माहिती सांगा.

  • ७) स्वतः मोबाईलचा वापर कमी करा; शक्य असल्यास गोष्टींची पुस्तके आणा. आजी-आजोबांसोबत त्यांना वाचू द्या.

  • ८) घरात वयस्कर लोक असतील तर त्यांच्या औषधांची, जेवण वाढण्याची, त्यांच्या सोबत राहण्याची जबाबदारी त्यांना द्या. ज्यामुळे आपुलकी, प्रेम, माया वाढीस लागेल.

  • ९) मुलांचे काही चुकल्यास सौम्य पण कडक शब्दांत त्यांना समज द्या; त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवा. त्यांना सुरक्षितपणाची जाणीव करून द्या.

  • १०) सुट्टीत नवीन काही शिकवण्याचा प्रयत्न करा. उदा. पोहणे ,चित्रकला वर्ग, हस्ताक्षरांचा वर्ग, यामुळे नवीन नवीन शिकण्याची आवड मुलांमध्ये निर्माण होईल.

मोबाईलपेक्षाही मैदानी खेळास प्राधान्य हवे

प्रत्येक पालकांनी उन्हाळा सुटीत आपल्या मुलांना पुरेसा वेळ द्यावा. मोबाईलचा वापर न करता मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे. त्यांच्यातील सुप्तगुण व कलेला वाव द्यावा.

- निलांबिका बरबडे, सहशिक्षिका, श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT