ray nagar solapur  sakal
महाराष्ट्र बातम्या

पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, सोलापुरातील ३०,००० घरांचा प्रकल्प माहितीयं का? उजनी ७० टक्के उणे झाले, तरी रे नगरला नियमित पाणी; झेडपीकडून आठवीपर्यंत शिक्षणाची सोय

उजनी धरण दरवर्षी १०० टक्के भरलेले असते, तरीसुद्धा ऐन उन्हाळ्यात धरण उणे ४० ते ५० टक्के होते. अशावेळी सोलापूर शहरासह जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करावे लागतात. मात्र, ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ या म्हणीची प्रचिती कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील नागरिकांना कधीच येणार नाही. धरण मायनस (उणे) ७० टक्के झाले, तरीदेखील रे नगरला दररोज पाणी मिळणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण दरवर्षी १०० टक्के भरलेले असते, तरीसुद्धा ऐन उन्हाळ्यात धरण उणे ४० ते ५० टक्के होते. अशावेळी सोलापूर शहरासह जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करावे लागतात. मात्र, ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ या म्हणीची प्रचिती कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील नागरिकांना कधीच येणार नाही. धरण मायनस (उणे) ७० टक्के झाले, तरीदेखील रे नगरला दररोज पाणी मिळणार आहे.

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता साधारणत: ११० टीएमसीपर्यंत आहे. त्यात ६३.६६ टीएमसी मृत आणि जिवंत पाणीसाठा ४६ टीएमसीपर्यंत असतो. सोलापूर शहर, कर्जत-जामखेड, धाराशिव, इंदापूर, बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातील काही नगरपरिषदा व ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून आहे. त्याशिवाय अनेक एमआयडीसी व ‘एनटीपीसी’ला देखील उजनीचाच आधार आहे. परंतु, सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून किमान तीनवेळा पाणी सोडावे लागते.

प्रत्येकवेळी सहा टीएमसी असे एकूण १८ ते २० टीएमसी पाणी नदीतून सोडल्याने १०० टक्के भरलेले धरण हमखास उणे होतेच अशी वस्तुस्थिती आहे. धरणाची पातळी उणे ४० टक्के झाल्यावर दुबार आणि ५०च्या पुढे गेल्यावर तिबार पंपिंग करून सोलापूरसाठी पाणी आणावे लागते. त्यासाठी महापालिकेला लाखोंचा खर्च करावा लागतो. पण, धरण उणे ७० टक्के झाल्यावरही रे नगरला दररोज ३६५ दिवस पाणी मिळणार आहे. धरणाच्या ठिकाणी तशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व सोयीसुविधांयुक्त उभारलेला ३० हजार घरांचा राज्यातीलच नव्हे तर देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

असा आहे ‘रे नगर’ प्रकल्प

  • प्रकल्पाची एकूण किंमत

  • १,८३१ कोटी

  • एकूण परिसर

  • ३६५ एकर

  • एकूण घरे

  • ३०,०००

  • एका घराचे क्षेत्रफळ

  • ३०० चौरस फूट

दरमहा २०० रुपयांची पाणीपट्टी

रे नगरातील प्रकल्पात सोलापूर शहरातून अंदाजे दीड लाख नागरिक स्थलांतरित होतील. एकूण ४४ ठिकाणी ८३३ इमारती (प्रत्येकी ३६ घरे) बांधल्या जात आहेत. प्रकल्पासाठी ‘एनटीपीसी’च्या आहेरवाडी पंपहाऊसमधून ६०० मिमी व्यासाच्या डीआय पाइपलाइनद्वारे १८ किलोमीटरपर्यंत पाणी आणले आहे. पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांसाठी पाण्याच्या तीन उंच टाक्या (२० मीटर) बांधलेल्या आहेत. त्यामधून एचडीपी पाइपलाइनद्वारे प्रत्येक घराला मीटरद्वारे दररोज पाणी वितरित केले जाणार आहे. प्रत्येक कुटुंबाला दरमहा २०० रुपयांची पाणीपट्टी द्यावी लागणार आहे.

अंगणवाडी ते आठवीपर्यंत शिक्षणाची सोय

रे नगर प्रकल्पातील रहिवाशांच्या त्याचठिकाणी मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. रे नगर प्रकल्पाच्या ठिकाणी ४० मिनी अंगणवाड्या सुरू होणार असून सुरवातीला प्रभारी सेविकांच्या मदतीने त्याचे कामकाज चालेल. नागरिक त्याठिकाणी राहायला आल्यावर त्यांच्यातूनच ४० सेविकांची पदे भरली जाणार आहेत. दुसरीकडे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सहा शाळा (उर्दू व मराठी माध्यमाच्या प्रत्येकी तीन शाळा) सुरू करण्यात येत आहेत. या शाळांना इंग्रजीसह इतर शिक्षक पुरेशा प्रमाणात असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT