baby sakal
महाराष्ट्र बातम्या

जन्म किंवा मृत्यू दाखला काढायचायं का? ग्रामपंचायत, महापालिकेकडे ‘इतक्या’ दिवसात तर ‘या’ कार्यालयातून मिळतात दाखले; 1 वर्षानंतर तहसीलदारांकडे करावा लागेल अर्ज

जन्म-मृत्यू नोंदीसाठी विलंब झाला तरी आता न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही. २१ दिवसांत अर्ज केल्यास महापालिका किंवा ग्रामपंचायत, नगरपालिकेतून दाखला मिळेल. त्यानंतर एक वर्षापर्यंत जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून आणि एक वर्षानंतर तहसीलदारांकडून दाखला घ्यावा लागेल.

तात्या लांडगे

सोलापूर : जन्म-मृत्यू नोंदीसाठी विलंब झाला तरी आता न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही. २१ दिवसांत अर्ज केल्यास महापालिका किंवा ग्रामपंचायत, नगरपालिकेतून दाखला मिळेल. त्यानंतर एक वर्षापर्यंत जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून आणि एक वर्षानंतर तहसीलदारांकडून दाखला घ्यावा लागेल. जन्म दाखल्यापेक्षा मृत्यू दाखला देताना यंत्रणेकडून कागदपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाते. जेणेकरून दाखल्याचा पुढे गैरवापर होवू नये, हा त्यामागील हेतू आहे.

शाळेतील प्रवेशाबरोबरच अन्य विविध कामांसाठी जन्माचा दाखला जरुरी आहे. मृत्यूचा दाखला देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. शहरी भागातील रुग्णालयात बाळाचा जन्म झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या रुग्णालयाच्या माध्यमातूनच संबंधित यंत्रणेकडे जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी अर्ज केले जातात. पण, घरी जन्म किंवा मृत्यू झालेल्यांच्या वारसांनी स्वत:हून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे २१ दिवसांत त्याची नोंद करणे आवश्यक आहे. याशिवाय भारतातील अनेकजण परदेशात राहाण्यासाठी आहेत (एनआरआय), त्यांना भविष्यात आपण भारतात आल्यावर आपल्या बाळाचा येथील जन्म दाखला लागतो. त्यासाठी त्यांना बाळाचा जन्म झाल्यानंतर ६० दिवसांत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करून दाखला मिळवता येतो.

सोलापूर शहरातील नागरिकांसाठी...

सोलापूर शहरातील ज्या व्यक्तीस आपल्या कुटुंबातील सदस्याचा जन्म किंवा मृत्यू दाखला हवा आहे, त्यांनी https://www.solapurcorporation.gov.in/ या संकेतस्थळावरील ई-सर्व्हिसेसवर जाऊन त्यातील जन्म-मृत्यू दाखल्याचा पर्याय निवडावा. त्याठिकाणी नोंदणी केल्यावर एक अर्ज उघडेल, त्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यावर शेवटी तो अर्ज ‘सबमिट’ करावा. पण, एखाद्या बाळाचा जन्म झाल्यापासून २१ दिवसांत किंवा कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यापासून तेवढ्या दिवसात ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. त्याहून जास्त दिवस झाल्यास जिल्हा उपनिबंधकांकडे (जिल्हा आरोग्याधिकारी) अर्ज करून त्यांच्याकडून दाखला घ्यावा लागतो. एखाद्याला एका वर्षानंतर दाखला काढायचा असल्यास त्यांना संबंधित तहसीलदारांकडून दाखला मिळतो. त्यावेळी विलंब शुल्क देखील द्यावे लागते.

ग्रामीण भागातील लोकांसाठी...

बाळाच्या जन्मानंतर किंवा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर २१ दिवसांत अर्ज केल्यास त्याची नोंद ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेकडून घेतली जाते. २१ दिवसांहून अधिक कालावधी झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनाही जिल्हा निबंधक (जिल्हा आरोग्याधिकारी) यांच्याकडून एक वर्षाच्या आत अर्ज केल्यास दाखला मिळतो. पण, एक वर्षानंतर त्यांना त्यांच्या तालुक्यातील तहसीलदारांकडे अर्ज करून दाखला घ्यावा लागेल. त्यावेळी मृत्यू दाखला हवा असल्यास संबंधित व्यक्तीच्या जन्माचा पुरावा, प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायतीत किंवा नगरपालिकेकडे नोंद नसल्याचा दाखला अर्जासोबत जोडावा लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीला दाखला देण्यापूर्वी जाहीर नोटीस दिली जाते. त्यावर कोणाचा आक्षेप किंवा हरकत न आल्यास त्यांना एका महिन्यात तहसीलदारांकडून दाखला दिला जातो.

एक वर्षानंतर जन्म-मृत्यू दाखला देण्याचा तहसीलदारांना अधिकार

भारत सरकारच्या राजपत्रानुसार अर्जदार व्यक्तीला एक वर्षानंतर जन्म-मृत्यू दाखले देण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे. त्यासाठी त्यांनी पुरेशा कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर त्यांना किमान ३० दिवसांत तो दाखला दिला जातो. मृत्यू दाखला देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या कागदपत्रांची खात्री केली जाते.

- विनायक मगर, तहसीलदार, अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT