light bill Sakal
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला 25 वर्षे मोफत वीज हवीयं का? मग, गृहनिर्माण संस्थांसह घरगुती वीजग्राहकांनी करावा ‘या’ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज, अनुदान पण मिळेल अन्‌ मोफत वीजही

घराच्या छतावरील १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पश्चिम महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ९०४ घरगुती वीजग्राहक सहभागी झाले असून त्यातील चार हजार ७१४ वीजग्राहकांकडे १९.३ मेगावॉट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील चार हजार ८०६ ग्राहकांनीही याचा लाभ घेतला आहे.

घराच्या छतावरील १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.

विशेष म्हणजे या सौर प्रकल्पांसाठी सौर नेटमीटर महावितरणकडून देण्यात येत असून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सोबतच या योजनेसाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. गेल्या सहा महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील चार हजार ८०६ ग्राहकांनी १४.६ मेगावॉट क्षमतेच्या छतावरील सौर प्रकल्पांसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८४० ग्राहकांचे ३.१ मेगावॉटचे सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहे.

२५ वर्षे वीज मोफत मिळणार

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अतिशय घरगुती व गृहसंकुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या प्रकल्पातून सुमारे २५ वर्ष मोफत वीज मिळणार आहे. तसेच गरजेपेक्षा शिल्लक राहिलेली वीज महावितरण विकत घेतली जाते व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. घरगुती ग्राहक व गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले.

ठळक बाबी...

  • छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये अनुदान

  • दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळते

  • गृहनिर्माण संस्था, घर संकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान

  • योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT