prakash ambedkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

"श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवलंय"

सुप्रीम कोर्टानं अध्यादेश स्थगित केल्याच्या पार्श्वभूमीवर केली विनंती

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य शासनानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काढलेला ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टानं सोमवारी स्थगित केला. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या निवडणुका रद्द करुन पुन्हा नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तसेच श्रीमंत मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण न देण्याचं ठरवल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

आंबेडकर म्हणाले, श्रीमंत मराठा समाजानं ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही असं ठरवलं आहे. महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की, जर याला कोणी न्यायालयात आव्हान दिलं तर हा अध्यादेश टिकणार नाही. त्यामुळं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी ओबीसींची वेगळी आणि इतरांची वेगळी अशा दोन निवडणूक घेऊ नये. उलट आता जाहीर केलेल्या 105 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका रद्द कराव्यात आणि नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी.

सुप्रीम कोर्टानं ताजा आदेश काय?

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यामुळं आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27 टक्के आरक्षण देता येणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आल्यानं आगामी 15 महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. जोपर्यंत योग्य डेटा आयोगाकडून अथवा समितीकडून मिळत नाही, तोवर हे आरक्षण लागू करत येणार नाही. हा 27 आकडा कशाच्या आधारावर आणला, याबाबत पुरेसा पुरावा मिळत नाही, तोवर हा अध्यादेश लागू करता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT